Manoj Parab X
गोवा

Colvale: 'राम मंदिराला हात लावू देणार नाही'! मनोज परब यांचा इशारा; पिर्णमधील रस्ता रुंदीकरणाच्या मुद्यावरून वातावरण गरम

Colvale Ram Mandir: परब यांनी सांगितले की, पिर्ण गावातील रस्ता रुंदीकरणाच्या मुद्यावरून सरपंच व काही ग्रामस्थांनी आमदार हळर्णकर यांची भेट घेतली.

Sameer Panditrao

पणजी: कोलवाळ येथील राम मंदिरही रस्ता रुंदीकरणात पाडले जाईल हे धक्कादायक वक्तव्य थिवीचे आमदार नीळकंठ हळर्णकर यांनी केले असल्याचा गंभीर गौप्यस्फोट रिव्होल्युशनरी गोवन्स पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला.

दरम्यान, राम मंदिर पाडण्याचे स्वप्न असेल, तर ते आमदाराने विसरावे! मंदिरालाच नव्हे, तर घर आणि दुकानांना देखील हात लावू देणार नाही, असा इशारा परब यांनी दिला. परब यांनी सांगितले की, पिर्ण गावातील रस्ता रुंदीकरणाच्या मुद्यावरून सरपंच व काही ग्रामस्थांनी आमदार हळर्णकर यांची भेट घेतली.

या बैठकीत आमदारांनी सरळ सांगितले की, राम मंदिर रस्त्यात जाणार आहे, तर लोक घरे घेऊन काय बसले आहेत? हे वक्तव्य ग्रामस्थांच्या धार्मिक भावनांशी थेट खेळ करणारे आहे.

ग्रामसभेत गावकऱ्यांनी १० मीटर रुंदीचे रस्ते रद्द करण्याचा ठराव केला असून सरकारने ग्रामस्थांचा आवाज ऐकला नाही, तर तीव्र जनआंदोलन उभे करू, असा इशाराही यावेळी देण्यात आला. परब यांनी स्पष्ट केले, की राम मंदिर पाडू देणार नाही अन् गोमंतकीयांची घरे व दुकानेही पाडू देणार नाही. हा लढा आमचा भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आहे, तो आम्ही थांबवणार नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये यशस्वी जयस्वालचा नवा इतिहास! 50 वर्षांनंतर ओल्ड ट्रॅफर्डवर घडवला 'हा' पराक्रम

Mobile Addiction: स्मार्टफोनमध्ये कॅमेरा आला, 'कोडॅक' नावाची कंपनी धोक्यात आली; मोबाइल नावाचा 'ब्रह्मराक्षस'

Video: 'ढवळीकर झोपले त्यांना जागे करा'; मुख्यमंत्री कुसुमाग्रजांची कविता सादर करताना युरींची मिश्किल टिपण्णी अन् सभागृहात हशा पिकला

Goa Assembly Session: गोव्यात आता रॉटवेलर, पिटबुलला 'नो एन्ट्री'! विधानसभेत विधेयक संमत, बंदीचा मार्ग मोकळा

Goa Assembly Session: 'गोवा दावे मूल्यांकन विधेयक, 2025' विधानसभेत संमत; वाचा दिवसभरातील घडामोडी

SCROLL FOR NEXT