पणजी: ‘‘आमदार वीरेश बोरकर यांना मीच घडवले होते. तरीही त्यांनी माझ्या पाठीत सुरा खुपसला. त्यामुळे त्यांना जसे घडवले, तसेच त्यांना राजकारणातून संपवून टाकेन’’, असा इशारा रविवारी रिव्हॉल्युशनरी गोवन्स पक्षात (आरजी) प्रवेश केलेल्या मनोज परब यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिला.
‘‘अध्यक्ष असतानाही मी पक्षातून बाहेर पडावे, यासाठी माझ्यावर दबाव आणला गेला. माझ्याविरोधात अपप्रचार करण्यात आला. त्यामुळे कंटाळून मी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, पण त्यानंतर वीरेश बोरकर यांना पक्षाच्या विचारधारेचा विसर पडला. त्यामुळे एकेकाळी आरजीचे भय असलेल्या परप्रांतीयांची दादागिरी सुरू झाली.
बोरकर यांनी विधानसभेत मिळालेल्यांशी सेंटिग करून स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरू केला. वीरेश यांच्या साथीदारांनी पक्षाच्या कार्यालयात येऊन आरजीच्या पदाधिकाऱ्यांना धमकावण्यास सुरुवात केली. त्यामुळे मला पुन्हा पक्षात प्रवेश करावा लागला’’, असे परब म्हणाले.
‘‘नगरनियोजन कायद्याच्या (टीसीपी) कलम ३९ ‘अ’ विरोधात बोरकर यांनी छेडलेल्या आंदोलनाला पक्षाचे पाठबळ होते. तरीही बोरकर याचे खापर माझ्यावर फोडत मला ‘सेटिंग’बाज म्हणत आहेत. या आंदोलनानंतर प्रत्येक मतदारसंघात जाऊन ३९ ‘अ’ विरोधात बैठका घेण्याचे त्यांनी जाहीर केले होते, पण मी राजीनामा दिल्यानंतरही तसे झाले नाही, असे परब यांनी स्पष्ट केले.
सुनावणीला उपस्थित राहण्याचे आवाहन
सांतआंद्रे मतदारसंघातील जमीन दोड्डामणी नामक परप्रांतीय व्यक्ती हडप करू पाहात आहे. त्यासंदर्भातील खटल्यावर मंगळवारी जिल्हाधिकाऱ्यांच्या न्यायालयात सुनावणी होणार असून त्यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन मी आरजी कार्यकर्त्यांना केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.