Goa Politics Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: राजकीय संन्यास सोडून मनोज परब पुन्हा मैदानात; 'आरजी'तील परब-बोरकर संघर्षाला नवे वळण

Manoj Parab Returns to Revolutionary Goans: आमदार बोरकर यांनी आपला आणि आरजीचा घात केल्‍याचा दावा करीत त्‍यांनी २० मे २०२५ रोजी पक्षाच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: काही महिन्‍यांपूर्वी रिव्‍हॉल्‍युशनरी गोवन्‍स पक्षाचा (आरजी) राजीनामा देत, राजकीय संन्‍यास घेतलेले मनोज परब रविवारी सायंकाळी पर्वरी येथील श्री गाडगे महाराज सभागृहात आयोजित कार्यक्रमात पुन्‍हा एकदा ‘आरजी’त प्रवेश करणार आहेत. त्‍यामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्‍या तोंडावर आरजीतील परब आणि बोरकर गटांतील वाद शिगेला पोहोचण्‍याची शक्‍यता आहे.

गत विधानसभा निवडणुकीत दर्जेदार कामगिरी करीत वीरेश बोरकर यांच्‍या नावाने पहिला आमदार निवडून आणलेला ‘आरजी’ या निवडणुकीतही दमदार कामगिरी करेल, असे सर्वांना वाटत असतानाच अंतर्गत वादाने पक्षाला पोखरण्‍यास सुरुवात केली. त्‍यातून पक्षाच्‍या अध्‍यक्षपदी असलेल्‍या मनोज परब यांनी सोशल मीडियाचा आधार घेत बोरकर यांच्‍यासह त्‍यांच्‍या जवळच्‍या व्‍यक्तींवर टीकास्र सोडण्‍यास सुरुवात केली.

दरम्यान, आमदार बोरकर यांनी आपला आणि आरजीचा घात केल्‍याचा दावा करीत त्‍यांनी २० मे २०२५ रोजी पक्षाच्‍या अध्‍यक्षपदाचा राजीनामा दिला. सोबतच सक्रिय राजकारणातून संन्‍यास घेत असल्‍याचेही जाहीर केले. त्‍यानंतर काहीच दिवसांत आमदार बोरकर यांनी स्‍वत:ला पक्षाचा राष्‍ट्रीय अध्‍यक्ष म्‍हणून जाहीर करून नव्‍या समित्‍या स्‍थापन केल्‍या. शविना नाईक शिरोडकर यांची पक्षाच्‍या प्रदेशाध्‍यक्षपदी नेमणूक केली. या घडामोडींनंतर पक्षात परब आणि बोरकर असे दोन गट पडल्‍याचे स्‍पष्‍ट झाले होते.

पक्षाबाबत परब कोणती भूमिका घेणार?

मनोज परब हे आरजीचे संस्थापक असून, पक्षाला तळागाळात पोहोचवण्‍यात त्‍यांचे मोठे योगदान आहे. सद्यस्‍थितीत परब आणि बोरकर या दोन्‍ही गटांकडून आरजी आपल्‍याकडेच असल्‍याचा दावा केला जात आहे. परंतु, मुख्‍य निवडणूक आयोगाने याबाबतचा चेंडू केंद्रीय निवडणूक आयोगाच्‍या कोर्टात टाकल्‍याने परब पुढील काळात कोणती भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

आमचा लढा कायम सुरू राहील : परब

‘‘माझ्‍यावर प्रेम करणाऱ्या, विश्‍‍वास असलेल्या मला नेहमीच पाठिंबा देत आलेल्‍या लोकांसाठी मी पुन्‍हा एकदा आरजीच्‍या माध्‍यमातून राजकारणात प्रवेश करीत आहे. गोवा आणि गोंयकारपण अबाधित राखण्‍यासाठी आमचा लढा कायम सुरू असेल. रविवारपासून माझ्‍या आयुष्‍यातील नवा अध्‍याय सुरू होईल’’, अशी प्रतिक्रिया मनोज परब यांनी सोशल मीडियाद्वारे व्‍यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

खरी कुजबुज: खाकी वर्दीचा धाक आता संपला?

Mexico Violence: ड्रग माफियाच्या अटकेनंतर रक्तरंजित धुमश्चक्री, अंदाधुंद फायरिंगमध्ये 11 जणांचा मृत्यू; मेक्सिकोत गुन्हेगारी टोळीचा हैदोस!

Crime News: आसगाव प्रकरणाची पुनरावृत्ती? आश्वे-मांद्रेतील पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह; अधिकाऱ्यांवर कारवाई कधी?

Goa Politics: काँग्रेसकडून उमेदवारीसाठी 40 मतदारसंघांत अर्ज मागवले, युतीची चर्चा अंतिम टप्प्यात; चोडणकरांनी स्पष्टच सांगितले

Accident News: चालकाला झोप लागली अन् होत्याचे नव्हते झाले! खाटूश्यामजीच्या दर्शनानंतर परतीचा प्रवास ठरला शेवटचा; भीषण अपघातात महाराष्ट्रातील 9 जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT