Manoj Parab And Amit Palekar Dainik Gomantak
गोवा

Goa Politics: 'मनोज परब यांची भाजपसोबत युती, ते हुर्राक सारखे आहेत'; B टीम आरोपानंतर आपचा पलटवार

Congress Vs Aap: रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी आप भाजपची बी -टीम कोण हे स्पष्ट झाल्याचे म्हटले होते.

Pramod Yadav

पणजी: दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान विरोधी पक्षनेत्या आतिषी यांनी गोव्यात स्वबळाचा नारा दिला आहे. आतिषी यांच्या एकला चलो रेच्या नाऱ्यानंतर भाजपची बी टीम कोण याचा गोमंतकीय जनतेने विचार करावा, असे मनोज परब यांनी म्हटले होते. यावरुन आता आम आदमी पक्षाने परब यांच्यावर पलटवार करत ते हुर्राक हंगामासारखे असल्याचा आरोप केला आहे.

काँग्रेसवर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, त्यांच्या आठ आमदारांनी पक्षांतर करुन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे येत्या पालिका, जिल्हा परिषद आणि विधानसभेसाठी काँग्रेससोबत युती करण्याचा प्रश्नच नाही, असे वक्तव्य आतिषी यांनी गोव्यात केले होते. यानंतर रिव्हॉल्युशनरी गोवन पक्षाचे प्रमुख मनोज परब यांनी आप भाजपची बी -टीम कोण हे स्पष्ट झाल्याचे म्हटले होते.

रिव्हॉल्युशनरी गोवन्स भाजपची बी - टीम असल्याचा आरोप केला जात होता. पण, आतिषी यांच्या एकला चलो रेच्या नाऱ्याने बी टीम कोण हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे गोमंतकीय जनतेने याचा विचार करुन येत्या निवडणुकीत कोणाला पाठिंबा द्यायचा हे ठरवावे, असे मनोज परब म्हणाले होते. यावरुन आता आपचे गोवा संयोजक अमित पालेकरांनी मनोज परब यांच्यावर पलटवार केला आहे.

"मनोज परब यांचे बरोबर आहे ते भाजपची बी-टीम नाहीत तर त्यांची भाजपसोबत युती आहे. ते हुर्राक हंगामासारखे आहेत. ते कितीवेळा बाहेर येतात आणि बोलतात हे तपासून पहा", असे आप नेते अमित पालेकर म्हणाले.

दरम्यान, काँग्रेसने याबाबत भूमिक मांडताना युतीबाबत योग्य निर्णय निवडणुका जवळ आल्यानंतर घेतला जाईल. पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबत चर्चा करुन निर्णय घेतील. काँग्रेसने राज्यातील ४० मतदारसंघात पक्षाला बळकटी देण्याचे काम सुरु केले आहे, असे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकरांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karnataka Madayi Water Project: कर्नाटकला केंद्राचा मोठा धक्का! सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयापर्यंत म्हादई प्रकल्पाची मंजुरी स्थगित

August Lucky Zodiac Signs: पैसा, पद अन् प्रतिष्ठा! ऑगस्ट महिन्यात ग्रहांचे मोठे गोचर; 'या' 5 राशींवर होणार पैशांचा पाऊस

Goa Karnataka Water Dispute: गोमंतकीयांचा पाण्याचा हक्क धोक्यात? म्हादईनंतर आता तिळारीवर नजर; गोव्याच्या पाण्यावर कर्नाटकच्या नव्या दाव्याची चाहूल

Rohit Sharma Retirement: रोहित शर्मा निवृत्त होणार? BCCI उपाध्यक्ष राजीव शुक्लांनी अफवांवर दिलं स्पष्ट उत्तर; 'हिटमॅन'बाबतचा संभ्रम दूर

Sonia Gandhi on Students Protest: 'विद्यार्थ्यांना शत्रू मानतं मोदी सरकार'! 'नीट' पेपरफुटीवरुन सोनिया गांधींचा हल्लाबोल

SCROLL FOR NEXT