Goa Traffic: मडगावात खासगी बसेसनी 'सिग्नल'लाच बनवलंय 'बस-स्टॉप'; अपघाताचा धोका, वाहतूक कोंडी, नागरिक त्रस्त

Private Buses Goa: 'नो स्टॉप, नो स्टँड' क्षेत्र असूनही, बस सिग्नलजवळ थांबतात, ज्यामुळे इतर वाहनचालकांना त्रास होतोय
Madgaon Traffic Problem
Madgaon Traffic Problem Dainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दक्षिण गोव्यातील मडगाव शहरात जुन्या मार्केटजवळील सिग्नलवर खासगी बसेस जागोजागी थांबत असल्याने वाहतुकीचा मोठा गोंधळ उडाला आहे. 'नो स्टॉप, नो स्टँड' क्षेत्र असूनही, बस सिग्नलजवळ थांबतात, ज्यामुळे इतर वाहनचालकांना त्रास होतोय आणि यावर वेळीच हालचाल केली जावी अशी मागणी त्यांच्याकडून केली जात आहे.

'नो स्टॉप'चे फलक गायब?

मडगावात अनेक खासगी बसेस रस्त्याच्या मध्यभागी थांबतात, ज्यामुळे धोका निर्माण होतो. वाहतूक पोलिसांना अनेकवेळा याबद्दल माहिती देऊन सुद्धा काहीही अपेक्षित बदल झालेला नाही. शहरात बस थांबण्यास परवानगी नसलेल्या ठिकाणी बस चालक बसेस थांबतात, यामुळे बस नेमकी कुठे थांब घेईल याचा अंदाज येत नाही आणि मागून येणाऱ्या वाहनचालकांसाठी धोका निर्माण होतो.

Madgaon Traffic Problem
Goa Traffic Violations: वाहतूक विभागाचा दणका! 15627 जणांविरुद्ध दंडात्मक कारवाई; 347 मद्यपींच्या परवाना रद्दची मागणी

खरंतर शहराच्या या ठिकाणी वाहतुकीचे प्रमाण अधिक असल्याने 'नो स्टॉप'चे फलक लावलेले असायला हवेत, पण ते फलक गायब झाले आहेत. यामुळे बसला तेथे थांबण्यापासून रोखणे अधिक कठीण झालेय अशी माहिती मगडाव पालिकेचे नगरसेवक विटोरिन त्रावासो यांनी दिली.

वाहतूक पोलिस असणं अनिवार्य

जागोजागी थांबणाऱ्या या खासगी बसेसमुळे शहरातील इतर वाहनचालकांना अपघात होण्याची भीती वाटत आहे आणि सध्या ते वाहतूक पोलिसांना कारवाई करण्याची मागणी करत आहेत. विशेषतः ट्रॅकिफच्यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दोन वाहतूक पोलीस अधिकारी तैनात करावेत, जे बस थांबवणाऱ्यांवर कारवाई करतील, अशी त्यांची मागणी आहे. बस चालक नियमांचे पालन करत आहेत याची खात्री करून घेण्यासाठी वाहतूक पोलिस असणं अनिवार्य आहे यामुळे वाहतूक सुरळीत होईल आणि स्थानिकांच्या सुरक्षेचा हा एकमेव मार्ग असल्याचं." विटोरिन म्हणालेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com