Manoj Joshi, Goa Kala Academy Dainik Gomantak
गोवा

Kala Academy वादात अभिनेते मनोज जोशींच्या मुलाखतीमुळे खळबळ; 'चाणक्य'च्या प्रयोगानंतर नाट्यगृह व्यवस्थेचे केले कौतुक

Actor Manoj Joshi At Goa: एका वृत्तवाहिनीने आपल्या फेसबुक हँडलवर मनोज जोशी यांचा व्हिडिओ प्रकाशित केल्यानंतर ज्याप्रकारे प्रतिक्रिया आल्या आहेत, त्या बहुतेक मनोज जोशी यांच्या हेतूविषयी शंका घेणाऱ्याच आहेत.

Sameer Panditrao

पणजी: एका खाजगी वृत्तवाहिनीवर ‘चाणक्य’ नाटकाचे नायक मनोज जोशी यांची मुलाखत व्हायरल झाली. यात मनोज जोशी असे सांगताना दिसत आहेत की परवाच्या दिवशी कला अकादमीमध्ये सादर झालेला ‘चाणक्य’ या नाटकाचा प्रयोग छान रंगला व त्यांना कुठलीही तांत्रिक अडचण आली नाही.

मात्र, दै. ‘गोमन्तक’च्या प्रतिनिधीने चौकशी केल्यानंतर कळले की, या नाट्यप्रयोगासाठी प्रकाशयोजना आणि ध्वनियंत्रणेची साधने भाड्याने आणण्यात आली होती व त्याचाच वापर कला अकादमीच्या नाट्यगृहात केला गेला. मात्र, नाट्यप्रयोग छान झाला हे सांगताना मनोज जोशी भाड्याने आणलेल्या या तांत्रिक साधनांचा उल्लेख आपल्या व्हिडिओत कुठेही करत नाहीत.

विशेष म्हणजे, असा व्हिडिओ आज रिलीज होणार याची चर्चा सकाळपासूनच काही व्हॉट्सॲप ग्रुपवर चालू होती. ‘जीजी’ यांच्या माणसांकडून हा व्हिडिओ प्रसारित होणार आहे असा उल्लेखही त्यात होत होता.‌

मनोज जोशी यांना यासंबंधी विचारले असता त्यांनी सांगितले, की ‘नाटक छान झाले व आपल्याला कुठलीही तांत्रिक अडचण आली नाही, हे जे मी म्हणालो होतो, ते अगदी खरे आहे. मात्र, ‘त्रिवेणी २०२५’साठी होणारे हे नाट्यप्रयोग राजश्री क्रिएशन्स ही संस्था पाहते. त्यामुळे त्यांनी आयोजक म्हणून प्रकाशयोजना व ध्वनियंत्रणा या संबंधात काय प्रयोजन केले होते ते आपल्याला ठाऊक नाही. मला प्रश्न विचारल्यानंतर मला जे काही ठाऊक होते तेवढेच मी बोललो आहे.’

या नाट्यप्रयोगासाठी भाड्याने आणलेली सर्व यंत्रणा गोमंतकीय पुरवठादारांकडूनच आणली गेली होती. फक्त कला अकादमीच नव्हे, तर गोव्यातील इतर नाट्यगृहात सादर होणाऱ्या या प्रयोगासाठीही त्यांचीच साधने प्रकाशयोजना व ध्वनियंत्रणेसाठी वापरण्यात येणार आहेत. काल मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये झालेल्या नाट्यप्रयोगातही त्याचाच वापर करण्यात आला.

विशेष कारणासाठीच व्हिडिओ बनविल्याचा सूर

एका वृत्तवाहिनीने आपल्या फेसबुक हँडलवर मनोज जोशी यांचा व्हिडिओ प्रकाशित केल्यानंतर ज्याप्रकारे प्रतिक्रिया आल्या आहेत, त्या बहुतेक मनोज जोशी यांच्या हेतूविषयी शंका घेणाऱ्याच आहेत. यातील एक प्रतिक्रियेत म्हटले गेले आहे की, ‘एक अभिनेता आपली भूमिका कशी जगतो याचे हे छान उदाहरण आहे’. चाणक्य नीती वापरून या अभिनेत्याने हा व्हिडिओ बनवला आहे, तर दुसऱ्या एका प्रतिक्रियेत या नाट्यप्रयोगासाठी लाईट्स आणि ध्वनियंत्रणा भाड्याने आणली गेली होती हे स्पष्टपणे मांडले आहे. एकंदर हा व्हिडिओ विशेष कारणासाठी बनवला गेला आहे असाच या प्रतिक्रियांचा सूर आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT