Manohar Parrikar Death Anniversary Dainik Gomantak
गोवा

Manohar Parrikar: असा नेता पुन्हा होणे नाही! गोवेकरांच्या लाडक्या 'मनोहर भाईंच्या' आठवणींना उजाळा

मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आणि गोव्याचे मुख्यमंत्री होते.

दैनिक गोमन्तक

Manohar Parrikar Death Anniversary : मनोहर गोपाळकृष्ण प्रभू पर्रीकर हे भारतीय जनता पक्षाचे भारतीय राजकारणी आणि गोव्याचे मुख्यमंत्री होते.

स्वादुपिंडाच्या कर्करोगामुळे पर्रीकर यांचे 17 मार्च 2019 रोजी निधन झाले. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT) मधून पदवीधर झालेले ते पहिले मुख्यमंत्री होते.

राजधानी पणजीचा आणि भाजपचा, राज्याचा बुलंद आवाज म्हणून ओळख कायम राहीलेल्या दिवंगत मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांची राजकीय कारकिर्द तशी संघर्षाचीच.

भाजपला गोव्यात शून्यातून सत्तेपर्यंत पोचवण्यासाठी त्यांनी पक्ष संघटनेच्या बांधणीतही त्यांनी हातभार लावला. भाजपकडे  सत्ता नव्हती, सरकार डळमळीत झाले त्यावेळी कार्यकर्त्यांत उत्साह कायम असावा यासाठीही ते झटले.

त्यांना भाजप नेते लक्ष्मीकांत पार्सेकर, केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर दत्ता खोलकर यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली.

पर्रीकर यांनी संरक्षण मंत्रालयाची धुरा सांभाळत शस्त्रास्त्रे मिळवली, ज्यापैकी अनेक वर्षे अनेक वर्षांपासून अडचणीत होत्या. त्यापैकी 36 डसॉल्ट राफेल लढाऊ विमानांच्या खरेदी करारासह दीर्घकाळ विलंबित असलेला MMRCA प्रकल्प होता. पर्रीकर लहानपणापासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्य होते.

आयआयटी मुंबईमधून पदवी मिळवल्यानंतर 2000 साली ते पहिल्यांदा गोव्याचे मुख्यमंत्री बनले. 2000 ते 2005 या काळात पर्रीकरांनी गोव्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं. 2012 साली पुन्हा मनोहर पर्रीकरांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली.

मतदारसंघाकडे पलीकडे जात, वास्तव समजून घेत त्यांनी राज्याचे हीत पाहिले, देशहीतही जपले. भाजपला बुलंद आवाज येत्या निवडणुकीतून पुन्हा मिळेल का? मनोहारी वारशाची परंपरा जपणे हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

प्रेमात धोका दिलेल्या व्यक्तीला पुन्हा जवळ करावं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं रंजक उत्तर; म्हणले...

Viral Video: तुमच्या पाया पडतो! भाजप नेत्याचे स्मशानभूमीत अश्लील उद्योग, विवाहित महिलेसोबत रेड हँड सापडला

UNESCO List: युनेस्कोच्या यादीत समाविष्ट झालेले शिवरायांचे 12 किल्ले कोणते? कोठे आहेत, इतिहास काय, कसे जाल? जाणून घ्या सर्व माहिती

Water Rafting Goa: पावसाळ्यात गोव्यात जाताय? सत्तरीत व्हाईट-वॉटर राफ्टिंगला झालीये सुरूवात; अधिक माहितीसाठी येथे क्लीक करा

Marathi Schools Goa: 'पालकांमुळे बंद पडल्या गोव्यातील मराठी शाळा'; शिक्षणमंत्री प्रमोद सावंत

SCROLL FOR NEXT