Miyawaki Plantation at Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport: आता 'मोपा'वर घेता येणार मोकळा श्वास! ‘मियावाकी’ वृक्षारोपणाचा अभिनव उपक्रम; जाणून घ्या फायदे

Miyawaki Plantation at Mopa Airport: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपावर जपानच्या धर्तीवर ‘मियावाकी’ पद्धतीचा उपयोग करून विविध प्रकारच्या देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यातून आरोग्य संवर्धनाला मोठा हातभार लागणार आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Miyawaki method used for plantation at Mopa Airport

म्हापसा: मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ मोपावर जपानच्या धर्तीवर ‘मियावाकी’ पद्धतीचा उपयोग करून विविध प्रकारच्या देशी झाडांची लागवड करण्यात आली आहे. त्यातून आरोग्य संवर्धनाला मोठा हातभार लागणार आहे.

जून २०२४मध्ये मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ३०पेक्षा जास्त स्थानिक प्रजातींची सुमारे ५१ हजार रोपे लावण्यात आली. विमानतळाच्या आत ६ एकर जागेवर हे वृक्षारोपण करण्यात आले आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आत हे मिनी जंगल, केवळ पर्यावरणातून वार्षिक १२,५०,००० किलो कार्बन काढून टाकण्यास मदत करेल. त्याचबरोबर दरवर्षी ५१,००,००० किलोपेक्षा जास्त ऑक्सिजनदेखील सोडेल. ज्यामुळे स्वच्छ हवा मिळेल. हे जंगल भूजल पातळी पुनर्संचयित करण्यास आणि जवळपासच्या प्रदेशात वातावरणातील तापमान कमी करण्यासदेखील मदत करेल.

विमानतळावर लागवड केलेल्या स्थानिक प्रजातींची यादी वन विभागाला लागवडीपूर्वी त्यांच्या पुनरावलोकनासाठी सामायिक करण्यात आली होती. प्रजातींची निवड योग्य पद्धतीने केली आहे. जेणेकरून तिथे पक्ष्यांना ती आकर्षित करू नये व त्यांनी तिथे घरटी बांधू नयेत. कारण हा विमानतळाचा परिसर आहे. एकदा पूर्ण वाढ झाल्यावर झाडांचा घेर ३० सेंटीमीटर असतो आणि पाच वर्षांत ३५-४० फूट उंची वाढते.

दरम्यान, याठिकाणी अंतर्गत ओव्हरहेड इम्पॅक्ट स्प्रिंकलर प्रणालीद्वारे रोपांना पाणी देण्यासाठी ३.५ किमीपेक्षा जास्त पाईपलाईन टाकण्यात आली. रोपांच्या यशस्वी लागवडीनंतर त्यांची आवश्यक देखभाल करणे आवश्यक असते. नियमित पाणी देणे, नियमित तण काढणे व झाडे सरळ वाढतील याची खात्री करण्यासाठी रोपांना बाबूंचा आधार दिला आहे. या रोपांच्या देखभालीचे काम तज्ज्ञांच्या टीमकडून मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या सहकार्याने केले जात आहे. सध्या रोपांचा जगण्याचा दर हा अंदाजे ९९.०० टक्के इतका असल्याचे ‘भारताचे ग्रीन हिरो’ तथा देशातील मियावाकी वृक्षारोपणचे जनक आर.के. नायर यांनी सांगितले आहे.

‘मियावाकी’चे भारतातील जनक आर. के. नायर

‘भारताचे ग्रीन हिरो’ तथा देशातील मियावाकी वृक्षारोपणचे जनक आर.के. नायर यांनी मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर वृक्षारोपण मोहिमेचे नेतृत्व केले आहे. त्यांनी मियावाकी वृक्षारोपण पद्धती वापरून देशातील १२ राज्यांमधील १२१ मिनी जंगलांमध्ये ३० लाखांहून अधिक झाडे लावली आहेत.

मियावाकी वृक्षारोपण पद्धत ही शेती किंवा बांधकाम यासारख्या कारणांसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीवर त्वरित जंगलांचे आच्छादन निर्माण करण्यासाठी सर्वात प्रभावी आहे. ती नैसर्गिक वनीकरणाच्या तत्त्वावर आधारित आहे. उदाहरणार्थ परिसरातील झाडे वापरणे आणि नैसर्गिक वन पुनरुत्पादन प्रक्रियांची प्रतिकृती करणे हा यामागचा हेतू आहे.

मियावाकी जंगलातील सर्वात लक्षणीय फायदा म्हणजे रोपे खूप जास्त घनतेवर लावली जातात. मियावाकी प्रकल्पात लावलेल्या दोन रोपांमध्ये वाढ होण्यासाठी स्पर्धा निर्माण होते. कोण किती वेगात वाढेल. या स्पर्धेतून या प्रकल्पातील रोपे लवकरच वृक्षात परिवर्तीत होऊन जंगलाचा झपाट्याने विकास होतो.

मियावाकी प्रकल्पात विविध झाडांची मुळे आपापसांत गुंतल्यामुळे जमिनीखाली मूळ संस्थाही सशक्त होते. मियावाकी प्रकल्पातील वृक्ष त्यांना लागणारे सेंद्रिय खत स्वतःच तयार करतात. मियावाकी प्रकल्पामुळे प्रदूषण चक्रीवादळ धूळ जमिनीची धूप यापासून संरक्षण मिळते तसेच भूगर्भातील पाणी पातळीत वाढ होते.

मियावाकी जंगल २० ते ३० वर्षांत घनदाट होते. जे बाकी बाबतीत १५० ते २०० वर्षे घेते. या जंगल लागवडीसाठी निवडलेल्या देशी प्रजातींची १-३ फूट उंचीची रोपे खरेदी करण्यात आली. तसेच, खत म्हणून कोकोपीट, गांडूळ खत व तांदळाचा भुसा वापरला. तसेच, कोरडे गवत मल्चिंग मटेरियल म्हणून वापरण्यासाठी घेतले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa: अळंबी खाल्ल्याने एकाच कुटुंबातील सहा जणांना विषबाधा, जीएमसीत उपचार सुरु; मये-डिचोलीतील घटना

Viral Video: 'पप्पा पोलीसमध्ये आहेत, गोळी घालेन...', होमवर्क दिल्यावर चिमुकल्याची थेट शिक्षिकेला धमकी; 'लिटिल डॉन'चा व्हिडिओ व्हायरल!

New Mahindra SUV: टोयोटाची झोप उडवणार महिंद्राची नवी पिकअप! स्कॉर्पिओ आणि थारचं जबरदस्त कॉम्बिनेशन

गोव्याच्या दारूवर महाराष्ट्राचे लेबल; तेलाच्या नावाखाली सुरु होती तस्करी, वैभववाडीत 41 लाखांचा मुद्देमाल जप्त

IND vs ENG 4th Test: मँचेस्टरमध्ये जो रुट गाठणार नवा 'माइलस्टोन'! 22 धावा करताच रचणार इतिहास

SCROLL FOR NEXT