Goa To Tashkent Direct Flight Mopa Dainik Gomantak
गोवा

Goa Mopa Airport: प्रवाशांना दिवाळी भेट! गोवा ते ताश्‍कंद.. आठवड्यातून दोन दिवस थेट विमानसेवा

Goa To Tashkent Direct Flight: मोपा विमानतळावरून ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे थेट विमानसेवा, आठवड्यातून दर बुधवार आणि रविवारी नियोजित उड्डाणे

गोमन्तक डिजिटल टीम

MOPA International Airport, Goa

पेडणे: मोपा विमानतळावरून आता ताश्कंद (उझबेकिस्तान) येथे थेट विमानसेवा सुरू झाली आहे. मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ व उझबेकिस्तान एअरवेजद्वारे संचालित इस्लाम करीमोव ताश्कंद आंतरराष्ट्रीय विमानतळ (टीएस) अशी विमान सेवा सुरू झाली आहे. या नव्या विमानमार्गामुळे दोन्ही देशातील प्रवाशांची सोय होणार आहे.

आठवड्यातून दर बुधवार आणि रविवारी नियोजित उड्डाणे असतील. एअरबस ए ३२० (Airbus A-320) किंवा समतुल्य विमानाचा वापर या सेवेसाठी होणार आहे. ताश्कंदला थेट उड्डाण होणार असल्याने उझबेकिस्तान, तसेच रशिया आणि युरोपमधील प्रमुख शहरांमध्ये जाणाऱ्या प्रवाशांसाठी ही सेवा उपयोगी ठरणार आहे.

रविवारी (दि. २७ ऑक्टोबर) रोजी ताश्कंदहून एअरबस ए-३२० निओ हे १११ प्रवाशांना घेऊन निघालेले विमान सकाळी १०.५५ वाजता मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले. त्यानंतर १२.१५ वाजता ८४ प्रवाशांना घेऊन तेच विमान पुन्हा ताश्कंदला रवाना झाले. या विमानप्रवासामुळे गोवा जागतिक स्तरावर इतर देशांसोबत जोडला गेला आहे.

समरकंद, बुखारा आणि खीवा या प्राचिन शहरांसाठी ओळखले जाणारे उझबेकिस्तान आपल्या समृद्ध इतिहासासाठी, शिवाय आदरातिथ्यासाठी भारतीय प्रवाशांमध्ये लोकप्रिय होत आहे. या देशात पर्यटन करू इच्छिणाऱ्यांना ही सेवा सुरू झाल्याने त्याचा फायदा होणार होईल.

त्याशिवाय उझबेकिस्तानमधील पर्यटकही गोव्यात विविध पर्यटनस्थळांना भेट देऊन येथील आदरातिथ्य अनुभवतील. ई-व्हिसा सुविधा आणि उच्च-स्तरीय पायाभूत सुविधांसह, मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ पर्यटकांसाठी तसेच स्थानिक विमानप्रवाशांसाठी आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोडलेला हात आणि पाय, लंगडी घालत आला पोलिस स्थानकात; ऑस्ट्रेलियन खेळाडुंची छेड काढणाऱ्या संशयिताला अटक Watch Video

Satish Shah: सलग 55 एपिसोडमध्ये साकारल्या 55 भूमिका, सतीश शाहांचे निधन; हसऱ्या चेहऱ्याचा पडला पडदा

गोव्यात प्रथमच पार पडली वजन-माप खात्याच्या नियंत्रकांची राष्ट्रीय परिषद; CM सावंतांनी दिली ग्राहकांच्या हक्काचे जतन करण्याची हमी

हाताशी आलेली भातशेती आडवी, पणजीत घराचे नुकसान; गोव्यात मान्सूनोत्तर पावसाचे धुमशान

आमदार दिलायला लोबोंचा भिंत बांधकामावर प्रत्युत्तर; आरोपांना दिले राजकीय हेतूचे वळण

SCROLL FOR NEXT