Manohar International Airport  Dainik Gomantak
गोवा

Manohar International Airport टॉप-20 मध्ये !

देशात विक्रमी कामगिरी : चार महिन्यात 10 लाख प्रवाशांची ने-आण

दैनिक गोमन्तक डिजिटल

गोव्याच्या पर्यटन क्षेत्रासाठी गेमचेंजर म्हणून पुढे आलेल्या मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाने अत्यंत कमी वेळात तब्बल 10 लाख इतक्या विक्रमी प्रवाशांची ने - आण करून देशातील महत्त्वाच्या व्यग्र ‘टॉप 20’ विमानतळांमध्ये स्थान मिळविले आहे.

अद्यापही या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमान सेवा सुरू झालेली नाही, ती सुरू झाल्यानंतर हे विमानतळ देशातील महत्त्वाचे विमानतळ बनेल अशी आशा आहे.

उत्तर गोव्यासह राज्यासाठी महत्त्वपूर्ण भूमिका बजावत असलेल्या महत्त्वाकांक्षी मोपा विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 11 डिसेंबर रोजी उद्‍घाटन झाआले होते. तर प्रत्यक्ष ५ जानेवारीपासून देशांतर्गत विमानसेवा सुरू झाली.

गेल्या 116 दिवसांमध्ये या विमानतळावर विविध कंपन्यांच्या विमानांतून तब्बल 10 लाख प्रवाशांनी प्रवासाचा आनंद घेतला आहे. मनोहर विमानतळाने एप्रिलपर्यंत तीन नवी शहरे जोडून देशातील 25 विमानतळांशी संपर्क वाढवला आहे.

"दशलक्ष प्रवासी मैलाचा दगड गाठणे, हा एक प्रशंसनीय टप्पा आहे. आम्हाला आणखी बरेच टप्पे गाठायचे आहेत. आम्ही आमचे भागीदार, प्रवासी आणि सर्व भागधारकांना विमानाची उत्कृष्ट देण्यासाठी वचनबद्ध आहोत. आंतरराष्ट्रीय मनोहर विमानतळ निवडलेल्या आमच्या प्रवाशांना सेवा देणाऱ्या टीमच्या प्रत्येक सदस्याचेही यात योगदान आहे."

आर. व्ही. शेषन, सीईओ-''जीएमआर’

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी जॅकपॉट! जानेवारी 2027 पर्यंत महागाई भत्ता पोहोचणार तब्बल 67 टक्क्यांवर; जाणून घ्या किती होणार फायदा

Jasprit Bumrah Record: भारताचा ‘बूम-बूम’ जलवा! जसप्रीत बुमराहचा महापराक्रम, टी-20 क्रिकेटमध्ये रचला इतिहास; असा मान मिळवणारा ठरला पहिलाच भारतीय गोलंदाज

Shocking Video: एका दिवसापूर्वीच राहायला आला, इमारतीच्या 43व्या मजल्यावरुन घेतली उडी, तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; धडकी भरवणार व्हिडिओ व्हायरल

Sikh Driver Attack: शीख चालकाची दाढी ओढली, डोक्यात वार करुन बस केली हायजॅक! ब्रिटनमधील संतापजनक घटनेनं खळबळ VIDEO

Women T20 Cricket: शिखाची अर्धशतकी झुंज निष्फळ; चंडीगडने गोव्याला 62 धावांनी धुतले

SCROLL FOR NEXT