Mopa Airport Dainik Gomantak
गोवा

Mopa Airport : मोपा विमानतळ रेल्वे मार्गाने जोडा ;भारतीय उद्योग महासंघाची सरकारकडे मागणी

आंतरराष्ट्रीय पातळीवर मालवाहतूक करणारी विमान सेवा सुरू करता येऊ शकते याकडे महासंघाने सरकारचे लक्ष वेधले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Mopa Airport पणजी, मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ राष्ट्रीय महामार्गाला उन्नत मार्ग बांधण्याचे काम सध्या जोरात सुरू आहे. आता याच्या जोडीला हा विमानतळ कोकण रेल्वे मार्गाला जोडण्यासाठी काम हाती घेतले जाऊ शकते.

राज्यातून निर्यात केल्या जाणाऱ्या मालासाठी हा विमानतळ रेल्वे मार्गाने जोडावा, अशी मागणी भारतीय उद्योग महासंघाने सरकारकडे केली आहे आणि सरकारने रेल्वे प्रशासनाकडे हा प्रस्ताव विचारार्थ पाठवलेला आहे.

राज्यातील औषध निर्मिती कंपन्यांकडून पूर्णतः उत्पादनांची निर्यात केली जाते. या औषधांचे कंटेनर सध्या रेल्वेवर लादून मुंबईच्या न्हावाशेवा बंदरात नेले जातात आणि तिथून ते जहाजावर चढवून विदेशात पाठवले जातात.

मुरगाव बंदरामध्ये कंटेनर हाताळणी करणारी क्रेन नसल्याकारणाने मुरगाव बंदरातून औषधवाहू कंटेनर यांची निर्यात केली जाऊ शकत नाही. यामुळे महासंघाने मोपा येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ रेल्वेने जोडावा असा प्रस्ताव सरकारला सादर केला आहे.

सरकारने तसे केले तर मोपा येथून आंतरराष्ट्रीय पातळीवर मालवाहतूक करणारी विमान सेवा सुरू करता येऊ शकते याकडे महासंघाने सरकारचे लक्ष वेधले आहे.

सरकारने व्यवस्थित पायाभूत सुविधा धोरण आखून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी महासंघाने सरकारला केलेलीआहे.

सध्या लॉजिस्टिकसाठी गोव्यात कोणतीही जागा अधिसूचित केलेली नाही, त्यामुळे या क्षेत्रामध्ये गुंतवणूक येऊ शकत नसल्याकडे महासंघाने लक्ष वेधले आहे. मोठाली गोदामे, शीतगृहे यांची साखळी राज्यात निर्माण होण्याची गरज महासंघाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे

मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळ रेल्वे मार्गे जोडण्यासंदर्भात सरकारशी आमची बोलणी झालेली आहेत. विमानतळ हा लोहमार्गाने जोडला गेला तर मालवाहतूक सुरळीत करणे शक्य होणार त्याशिवाय प्रवाशांनाही त्याचा फायदा होणार आहे.

सरकारने या प्रस्तावावर गांभीर्याने विचार केला तर मोपाच्या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय पातळीवरील मालवाहतूक विमानसेवा लवकर सुरू होऊ शकते.

- अनिरुद्ध अगरवाल,

अध्यक्ष, भारतीय उद्योग महासंघ.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मृत्यूचा सापळा बनला होता 'बर्च' क्लब, नियम धाब्यावर बसवून मिळाले परवाने; चौकशी अहवालाचा 'खळबळजनक' निष्कर्ष

"गोव्याच्या मुक्तिलढ्यात, जडणघडणीत मराठा समाजाचे महत्त्वपूर्ण योगदान"; मुख्यमंत्री डॉ. सावंत

Goa News Live: डिचोलीत मृतावस्थेत आढळलेल्या लक्ष्मी भिकाजी शिरोडकर या महिलेचा खून

Goa Road Closure: पर्वरीकरांनो सावधान! 2 जानेवारीपासून महामार्गावर मोठे बदल; असा असेल तुमचा प्रवासाचा नवा मार्ग

VIDEO: सराव सत्रादरम्यान मैदानावरच बेशुद्ध पडले अन्... विश्वचषक जिंकवून देणाऱ्या प्रशिक्षकाचं निधन; क्रिकेट विश्वावर शोककळा!

SCROLL FOR NEXT