Casino Dainik Gomantak
गोवा

Mopa: "Casinoला लोकांचा असेल, तर माझाही विरोधच"

संधी साधून आता धारगळ येथे कॅसिनो हॉटेल प्रकल्प होऊ घातला आहे

दैनिक गोमन्तक

मोरजी: धारगळ-ओशेलबाग येथील चार लाख चौरस मीटर जागेत एका तारांकित हॉटेल व त्यात कॅसिनो प्रकल्प होऊ घातला आहे. प्राथमिक स्थरावर या प्रकल्पाला मंजुरी मिळालेली आहे. याविषयी धारगळ पंचायत कार्यालयात कोणत्याच प्रकारचे परवाने मिळवण्यासाठी फाईल आली नाही. तर दुसऱ्या बाजूने उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर (Manohar Ajgaonkar) म्हणतात, या प्रकल्पाला अजूनपर्यंत मंत्रिमंडळाने परवानगी दिलेली नाही. लोकांचा विरोध असेल, तर आपलाही कॅसिनोला (Casino) विरोध असेल, अशी भूमिका उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी घेतल्याचे सांगितले.

स्वाभिमानी पेडणेकर सध्या शांत असल्याचा फायदा प्रशासनाने घेतला असून, पेडणे तालुका मोपा विमानतळामुळे कसिनो झोन करण्याच्या नजरेतून पाऊले टाकलेली आहे. शांत असलेल्या पेडणेकरांना परत एकदा सरकारने जागृत होण्यासाठी गॅम्ब्लिंग झोनला परवानगी देताना 100 एकर जमिनीत उभारण्यास हिरवा कंदील दाखवला, असल्याचे सांगून स्थानिकांनी विरोध असल्याचे सांगितले.

तालुक्यातील नियोजित 13वा आंतरराष्ट्रीय मोपा विमानतळ प्रकल्पामुळे तालुक्याच्या विकासाची दारे उघडली जाणार आहेत. विकासाबरोबरच काही वाईट प्रवृत्तींना थाराही मिळणार आहे. मोपा विमानतळ परिसरात यापूर्वीच गेम्ब्लिंग झोन करण्याच्या नजरेतून पाऊले उचललेली आहे, आणि या गॅम्ब्लिंग झोनविषयी तालुक्याच्या दोन्ही आमदारांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. हीच संधी साधून आता धारगळ येथे कॅसिनो हॉटेल प्रकल्प होऊ घातला आहे, असा लोकांचा आरोप आहे.

गोवा गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने मंजूर केलेल्या 7 प्रस्तावांत धारगळ येथील पंचतारांकित प्रस्तावाचा समावेश आहे. डेल्टा प्लेजर कॉर्प कंपनी जी राज्यात कॅसिनो व्यवसाय चालवते त्या कंपनीकडून धारगळ येथे 4 लाख 27 हजार 50 चौरस मीटर जागेत हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. या प्रकल्पातून 4 हजार रोजगार निर्मिती होईल, अशी हमी कंपनीने सरकारला दिली आहे. प्रस्ताविक मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अनुषंगाने हे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

"मोप विमानतळामुळे तालुक्याचा विकास होईल ही अपेक्षा आहे; मात्र कसिनो येईल, हे स्वप्नातही वाटले नव्हते. 25 लाख चौरस मीटर जागेत विमानतळ उभारता येतो. पण, सरकारने तब्बल 90 लक्ष चौरस मीटर जागा ताब्यात घेतली आहे. तिथेच संशय येतो. मोप विमानतळ परिसरात कसिनो उभारण्यास आमचा विरोध आहे."

- सुबोध महाले उपसरपंच, मोप

"पेडणेवासीयांना वीज, पाणी, रस्ते, रोजगार यांची खरी गरज आहे. कसिनो आणून सरकार पेडणेतील युवा पिढीला बरबाद करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्यामुळे राजकीय मतभेद विसरायला हवेत. ‘कोरोना’चे संकट असल्याने जनतेत भीती आहे. सरकारने फेरविचार करून जनहित साधणारे प्रकल्प आणावेत."

- राजन कोरगावकर कार्यकर्ते मिशन फॉर लोकल

प्रस्तावात नमूद केलेली जमीन अधिकतर शेतजमीन आहे, तर बहुतांश जमीन ही तिळारी पाटबंधारे अंतर्गत ओलीत क्षेत्रातील आहे, अशी माहितीही समोर आली आहे. डेल्टा कॉर्प ही जयदेव मोदी यांची कंपनी आहे. भारतातील कॅसिनो उद्योग जगताचे ते किंग समजले जातात.

पेडणे तालुक्यातील मांद्रेचे आमदार दयानंद सोपटे आणि उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर हे दोन्ही लोकप्रतींनीधी पेडणेवासीयांचे विधानसभेत प्रतिनिधित्व करत आहेत. या दोन्ही लोकप्रतिनिधींनी आपली भूमिका स्पष्टपणे मांडावी, अशी लोकांची मागणी आहे.

लोकांचा विरोध तर आपलाही विरोध असेल असे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर सांगतात, तर दुसऱ्या बाजूने मांद्रे येथे सरकारी जमिनीत मनोरंजन सिटी तयार करण्यासाठी आमदार दयानंद सोपटे प्रयत्नशील आहेत.

प्रकल्पातील गोष्टी

  • पंचतारांकित पाच हॉटेल्स

  • कॅसिनो व्यवसाय

  • कन्वेन्शन सेंटर

  • मल्टिप्लेक्स सिनेमा हॉल

  • रिटेल एरिया

  • इलेक्ट्रॉनिक कसिनो

  • वॉटर पार्क

  • बॅन्कवेट सुविधा

  • चिल्ड्रन्स इंटरटेन्मेंट एरिया

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fishing Boat Missing: भरकटलेल्या मच्छिमारांचा अखेर 12 तासांनंतर शोध, चारही जण सुखरूप तळपण जेटीवर

Goa News Live: लुथरा बंधुंना घेऊन दिल्लीतून निघाले गोवा पोलिस

Mungul Gang War: मुंगूल गॅंगवॉर प्रकरणातील संशयितांना जामीन मंजूर, 50 हजारांच्‍या हमीवर मुक्‍तीचा आदेश

Prithvi Shaw-Sapna Gill: 'विनयभंगाचे आरोप खोटे, माझा अपमान करण्याचा प्रयत्न'; 'पृथ्वी शॉ'नं सपना गिलचे आरोप फेटाळले

ZP Election: गोवा जपण्यासाठी योग्य व्यक्तीला मत द्या! समाज कार्यकर्त्यांची हाक, शहाणपणाने मतदान करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT