Indigo  Dainik Gomantak
गोवा

Panjim: मनोहर विमानतळ 8 शहरांना जोडणार; ‘इंडिगो’ची आठवड्याला 168 उड्डाणे

मोपा विमानतळ आठ शहरांना जोडत असल्याची घोषणा ‘इंडिगो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी काल केली.

दैनिक गोमन्तक

Panjim: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पहिले विमान उतरवण्याचा मान मिळविलेल्या इंडिगो कंपनीने ‘मोपा’वरून आठवड्यात 168 उड्डाणे केली जातील, असे सांगून देशातील प्रमुख आठ शहरांना जोडत असल्याची घोषणा ‘इंडिगो’चे मुख्य कार्यकारी अधिकारी पीटर एल्बर्स यांनी काल केली.

एल्बर्स म्हणाले,की आपले आंतरदेशीय नेटवर्क अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने इंडिगो या देशातील आघाडीच्या ‘कॅरियर’ने आज मनोहर आंतराष्ट्रीय विमानतळावरून उड्डाणांची सुरुवात केली आहे. हैद्राबाद आणि गोवा या दरम्यान हे पहिले उड्डाण होते.

‘इंडिगो’कडून मोपा विमानतळावरून आठवड्याला 168 उड्डाणे होणार असून देशांतर्गत 8 स्थळांमध्ये हैद्राबाद, दिल्ली, मुंबई, बंगलोर, चेन्नई, पुणे, जयपूर आणि अहमदाबाद यांचा समावेश आहे.

नव्या नेटवर्क मुळे गोव्याची वाढती लोकप्रियता लक्षात घेऊन त्यांची मागणी पूर्ण होणार असून गोवा हे पर्यटकांचे आवडते स्थळ असल्यामुळे आता ग्राहकांना नवीन पर्याय उपलब्ध होऊन प्रवासही अधिक परवडणारा आणि उत्तर गोव्याच्या प्रगतीसाठी परिणामकारक ठरू शकेल, असेही ते म्हणाले.

दक्षिण गोव्यात दाबोळी विमानतळावरून कार्यरत असलेली विमानसेवा आणि उड्डाणे पूर्वीप्रमाणे सुरूच राहतील. परवडणारे दर, वेळेतील कार्यक्षमता, नम्र आणि सोपी सेवा, जोडणी ही लोकांच्या आवडीच्या ठिकाणी उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनावर ठाम आहोत,असे पीटर एल्बर्स म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: 'गोवा फर्स्ट'चा नारा पुन्हा बुलंद! धर्मनिरपेक्ष आघाडीसाठी समविचारी पक्षांना एकत्र आणणार; गोवा फॉरवर्डची भूमिका स्पष्ट

खरी कुजबुज: कुडतरीत भाजपची शरणागती?

Goa Drug Case: ड्रग्स प्रकरणात गोव्याचा 'बाबा' आणि 'मुन्ना' चर्चेत; हैदराबादेत अटक केलेल्या तस्कराच्या चौकशीत आंतरराज्य नेटवर्कचा गौप्यस्फोट

Pakistan Airstrike Afghanistan: पाकड्यांची अफगाणिस्तानवर पुन्हा एअरस्ट्राइक! कुनार अन् पक्तिका प्रांतावर केला बॉम्बवर्षाव; अनेक जण गंभीर जखमी

Goa Crime: मोखर्ड येथे एकाच घरात दोन बहिणींचे कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह; दुर्गंधी आल्यानंतर उघडकीस आला धक्कादायक प्रकार

SCROLL FOR NEXT