Mankurad Mango in Panjim Market Dainik Gomantak
गोवा

Mankurad Mango : मानकुराद अजूनही सामान्यांच्या खिशाला परवडेना!

अडीच हजार रुपये डझन : हापूस, पायरी, शेंदुरी आंबे बाजारात दाखल, दरात चढ-उतार

दैनिक गोमन्तक डिजिटल

राज्याच्‍या बाजारपेठांमध्ये मानकुराद आब्यांचे आगमन होऊन दोन महिने होत आले, परंतु अजूनही तो भाव खातच आहे. अडीच हजार रुपये प्रतिडझन दराने तो विकला जातोय. महिन्याभरापूर्वी 5 हजार रुपये प्रतिडझन दराने मानकुराद विकला जात होता.

मानकुराद आंब्यासोबतच हापूस, पायरी, शेंदुरी, शाबेर अशा विविध प्रकारचे आंबे बाजारात दाखल झाले असून हापूस 2 हजार रुपये प्रतिडझन दराने विकला जात आहे. सर्वसामान्य नागरिकांना एवढी रक्कम देऊन आंब्याची चव चाखणे शक्य नसल्याने किमतीत घट होण्याची वाट पाहिली जात आहे.

पुढील महिन्यात मोठ्या प्रमाणात आंब्‍याचे उत्पादन वाढेल, त्यावेळी सर्वांना परवडण्यायोग्य दर होईल, असे विक्रेते सांगतात. पिकलेल्या मानकुराद आंब्यांचे उत्पादन कमी असले तरी मोठ्या प्रमाणात कच्च्या कैऱ्या बाजारात दाखल होत आहेत. आकाराप्रमाणे दरात चढउतार आहे.

फळांना वाढती मागणी

राज्यात उकाडा वाढल्याने अनेक ग्राहक मोठ्या प्रमाणात कलिंगड, मोसंबी, सफरचंद, द्राक्षे तसेच इतर रसदार फळे खरेदी करताना दिसत आहेत. त्यामुळे फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. कलिंगडाला इतर फळांच्या तुलनेत अधिक मागणी असल्याचे विक्रेते सांगतात.

भाजीपाल्याचे दर स्थिर

राज्यात भाजीपाल्याचे दर गेल्या महिन्याभरापासून स्थिर आहेत, परंतु हिरव्या मिरचीने तोंडचे पाणी पळविले आहे. हिरवी मिरची 120 रु. प्रति किलो दराने विकली जात आहे. गेल्या वर्षांपासून हिरव्या मिरचीच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Father Bolmax Pereira: बोलमॅक्स परेरा: गोव्याचा हरित धर्मगुरू हरपला

Shul Yog 2026: 14 जूनपासून ग्रहांचा मोठा प्रकोप! 'शूल योग' आणणार 5 राशींच्या आयुष्यात मोठं वादळ; नवीन नातं जोडताना शंभर वेळा विचार करा

Goa Betting Links: क्रिकेट सट्टेबाजी अन् मनी लॉन्ड्रिंगचे धागेदोरे अखेर गोव्यापर्यंत; वर्ध्यातील बडे क्रिकेट बुकी पोलिसांच्या रडारवर

Goa Politics: मगो पक्ष राष्ट्रीय पक्षांच्या दावणीला, ढवळीकरांवर प्रा. युगांक नाईकांची घणाघाती टीका; स्वतःचं मंत्रिपद टिकवण्यावर दिला भर

Goa Electric Vehicles: चार्जिंग स्टेशन अभावी होणारी ई-वाहनधारकांची वणवण आता थांबणार; प्रमुख रस्ते, हायवे आणि पर्यटनस्थळांवर होणार नव्या केंद्रांची निर्मिती

SCROLL FOR NEXT