Mankurad Mango in Panjim Market Dainik Gomantak
गोवा

पणजी बाजारात गोवा मानकुराद आंबे दाखल

माणकुरात 3000, सिंदुरी 700, तोतापुरी आंब्याची 600 रुपये प्रती डझन विक्री

दैनिक गोमन्तक

पणजी : मानकुराद, सिंदुरी, तोतापुरी आंबे पणजीच्या बाजारामध्ये दाखल झाले आहेत. गोव्यातील चोखंदळ ग्राहकदेखील आंबे खरेदी करण्यासाठी आणि पहिल्या आंब्याची चव चाखण्यासाठी चढाओढ करताना दिसत आहेत. यंदा आंब्याला चांगला भाव मिळत असल्याने आंबा व्यावसायिकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

मानकुराद आंब्यांची दर 3000 रु प्रतिडझन , सिंदुरी 700 तर तोतापूरी आंबे 600 रूपये दराने उपलब्ध आहेत. गेल्या काही आठवड्यांपासून भाज्यांचे दरही समाधानकारक आहेत. कांदा, बटाटा, टोमॅटोचे दर महिन्याभरापासून स्थिर आहेत. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या प्रभावामुळे ग्राहक बाजारात जाणे प्रामुख्याने टाळत होते मात्र आता पणजी मार्केटमध्ये (Market) ग्राहकांची वर्दळ वाढत असल्याचे दिसून येत आहे.

मेथी, कारली, बिन्स आणि भेंडीचे दर सध्या वाढलेले आहेत. हिरवी मिरची 120 ते 140 रुपये प्रती किलो दराने विकली जात आहे. शेवग्याच्या शेंगा 50 ला 5 या दराने विकल्या जात आहेत. तापमानात वाढ होत असल्याने संत्री, मोसंबी, कलिंगड, शहाळे, द्राक्षे आदी फळांना देखील बाजारात चांगली मागणी आहे. पणजी (Panjim) मार्केटमध्ये खरेदीसाठी आलेले ग्राहक उन्हाच्या कडाक्यापासून गारवा मिळविण्यासाठी शहाळे विकत घेताना दिसत आहेत.

दरम्यान तेलाच्या दरात गेल्या आठवड्यापासून वाढ होताना दिसत आहे. रशिया-युक्रेन (Ukraine) युद्धाचा परिमाण खाद्यतेलांवर होताना दिसत आहे. खाद्यतेलांच्या किमतीत वाढ झाली असून पामतेलाचे दर 160 रु प्रतीलिटर झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Naru Disease: गोवेकरांनो सावधान! फोंड्यात आढळला धोकादायक ‘नारू’? 25 वर्षांपूर्वी झाला होता देशातून नष्‍ट

Poingunin: काँग्रेसच्‍या काळात फक्त विकासकामांचे दगड! पंचायतमंत्री गुदिन्हो यांचा टोला; पैंगीणमध्ये सभागृहाचे उद्‌घाटन

Goa Live News: एअर इंडियाच्या गोंधळानंतर काँग्रेस नेते आणि खासदार वेणुगोपाल यांनी चेन्नई विमानतळावरचा अनुभव केला शेअर

Goa Marathi Film Festival: जारण, कुर्ला टू वेंगुर्ला, जित्राब! मराठी चित्रपटांना रसिकांची मोठी गर्दी

Goa Rain: पावसाचा जोर वाढणार! वेधशाळेने दिला इशारा; 14 तारखेपासून यलो अलर्ट

SCROLL FOR NEXT