Mankurad Mango in Panjim Market Dainik Gomantak
गोवा

Mankurad Mango : मानकुराद बाजारात आला; पण दर ऐकून हिरमोड झाला!

बाजारात पहिल्यांदा मानकुराद दाखल करण्यात शिवोली गावाने मान पटकाविला

गोमन्तक डिजिटल टीम

Mankurad Mango : गोव्यातील प्रसिद्ध ‘मानकुराद’ आंबा बाजारात आला खरा; पण त्याचे दर ऐकून हिरमोड झाला, असे म्हणण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. कारण तब्बल सहा हजार रुपये प्रतिडझन याप्रमाणे सध्याचा दर आहे.

पहिल्यांदा बाजारात दाखल होणारे आंबे खाणारा श्रीमंत वर्ग आहे. त्यांच्यासाठी हा दर परवडणारा असू शकतो. मात्र, इतर ग्राहकांनी दर ऐकूनच खिसे चाचपले.

आतापर्यंत बाजारात पहिल्यांदा मानकुराद दाखल करण्यात शिवोली गावाने मान पटकावला आहे. शिवोलीतून प्रत्येक वर्षी मानकुराद आंबा सर्वप्रथम बाजारात येतो. गोव्यात मानकुराद आंब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते.

मानकुराद ही गोव्याची ओळख आहे. देशात इतर कोठेही हा आंबा पोहोचत नाही. परंतु परदेशात मात्र या आंब्याची निर्यात होते. ठराविक शेतकरीच हा आंबा निर्यात करतात. कोकणातून हापूस आंबा परदेशात जातो. हापूस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांची संख्याही मोठी आहे, तशी गोव्यात मानकुरादबाबत स्थिती नाही.

पायरी दाखल; तोतापुरीची प्रतीक्षा

अनेक ठिकाणी आंब्याची झाडे मोहोरलेली दिसतात. काही ठिकाणी लहान फळेही लागली आहेत. सध्या उष्ण-दमट तापमान असल्याने आंबा पीकवाढीसाठी ते पूरक आहे. ढगाळ वातावरणाचा मोहोरावर विपरित परिणाम होतो.

परंतु अलीकडे वातावरण स्वच्छ आहे. शिवाय आंबा, काजू पिकासाठी ते पोषक आहे. मानकुरादबरोबर पायरी आंबाही बाजारात आला आहे. तोतापुरी काही दिवसांत बाजारात येण्याची शक्यता असल्याचे पणजीतील फळविक्रेत्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India vs Pakistan: टीम इंडियाला हरवण्यासाठी पाकड्यांचा 'मास्टरप्लॅन', शोएब अख्तर, म्हणाला, 'त्या' फलंदाजाला 2 ओव्हर्समध्ये आउट करा

रामा काणकोणकर हल्ला प्रकरण; गुंड जेनिटोसह आठ जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

Goa Children Court: पोटच्या 20 वर्षीय मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप, आठ वर्षानंतर लागला निकाल

आम्ही देशप्रेमी, तू देशद्रोही! गोव्यात आणखी एका सामाजिक कार्यकर्त्याला धमकी, BJP नेत्याने धमकीचा फोन केल्याचा आरोप

Goa Live Updates: Goa Rain: पुन्हा पावसाचा इशारा!

SCROLL FOR NEXT