Manjunath Dukale panel wins in Jambavali's Damodar Devasthan election
Manjunath Dukale panel wins in Jambavali's Damodar Devasthan election Dainik Gomantak
गोवा

जांबावलीच्या दामोदर देवस्थान निवडणुकीत मंजुनाथ दुकळे पॅनलचा दणदणीत विजय

दैनिक गोमन्तक

मडगाव: जांबावली येथील प्रसिद्ध अशा श्री रामनाथ दामोदर देवस्थानाची नवीन कार्यकारिणी निवडून काढण्यासाठी झालेल्या निवडणुकीत या देवस्थानाचे माजी अध्यक्ष मंजुनाथ दुकळे यांच्या पॅनलने दणदणीत विजय मिळविला. गोव्याबाहेरील महाजनांनी दुकळे यांच्या पॅनलला पूर्ण पाठिंबा दिल्याने त्यांचा विजय सार्थ झाला. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत स्वतः दुकळे यांनी संदेश हेगडे देसाई यांच्यावर 162 मतांनी विजय मिळविला.

(Manjunath Dukale panel wins in Jambavali's Damodar Devasthan election)

गोव्याबाहेरील महाजनांना मतदानाचा अधिकार आहे की नाही या मुद्द्यावर ही निवडणूक वादात सापडली होती. मतदान करणारा महाजन गोव्यात स्थाईक असणे आवश्यक असा मुद्दा पुढे करून गोव्याबाहेरील महाजनांना मतदान करण्याचा अधिकार नाकरल्यामुळे गोव्या बाहेरील 16 महाजन मुंबई उच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयाने सुरवातीला अंतरिम आदेश गोमंतकीय आणि बिगर गोमंतकीय या दोन्ही बाजूच्या महाजनांना वेगवेगळे मतदान करण्यास सांगून ही मते सील करून सांगे मामलेदार कार्यालयात ठेवण्यास सांगितले होते. मागच्या आठवड्यात दिलेल्या अंतिम आदेशात गोव्या बाहेरील महाजनांचा मतदानाचा हक्क अबाधित ठेवत सांगे ममलेदारांना मतमोजणी करण्याचा निर्देश दिला होता.

त्यानुसार सांगेचे मामलेदार राजेश साखळकर यांनी मतमोजणी केली. सुरवातीला गोव्यतील महाजनांची मते मोजणीसाठी घेतली असता दुकळे यांच्या पॅनलमधील अध्यक्षपदाचे उमेदवार मंजुनाथ दुकळे याना फक्त 76 मते मिळाली. त्यांच्या गटातील खजिनदार गणाधिश कुंदे याना 71, एटर्णी साईश हेगडे याना 63 तर सचिव अमित हेगडे याना 68 मते मिळाली उलट प्रतिस्पर्धी हेगडे देसाई यांच्या पॅनलच्या संदेश हेगडे देसाई याना 201, जयेश कामत बांबोळकर याना 205, प्रसाद घोडे याना 215 तर आंनद कुंदे याना 210 मते मिळाली.

मात्र गोव्याबाहेरील महाजनांची मते मोजण्यास सुरुवात केली असता परिस्थिती उलटी झाली दुकळे गटातील चारही उमेदवारांना 312, 321,311 व 312 अशी घसघशीत मते पडली तर हेगडे देसाई गटातील उमेदवारांना 19, 11, 21 व 20 अशी मते पडली. उपसमिती निवडतानाही तसाच प्रकार घडला.

मामलेदार साखळकर यांनी निकाल वाचला त्यात अध्यक्षपदासाठी मंजुनाथ दुकळे यांनी संदेश हेगडे देसाई यांच्यावर 162, खजिनदारपदासाठी गणाधिश कुंदे यांनी जयेश कामत बांबोळकर यांच्याबर 176, एटर्णीपदासाठी साईश हेगडे यानी प्रसाद घोडे यांच्यावर 138 तर सचिवपदाच्या निवडणुकीत अमित हेगडे यांनी आनंद कुंदे यांच्यावर 150 मतांनी विजय मिळविला.

उपसमिती निवडणुकीत अध्यक्ष, खजिनदार, एटर्णी व सचिव पदासाठी झालेल्या निवडणुकीत दुकळे गटातील अमय भोबे यांनी उदय घोडे यांच्यावर 160, प्रताप खोपे यांनी गजानन दुकळे यांच्यावर 152, अतिष दुकळे यांनी प्रताप कामत बांबोळकर यांच्यावर 146 तर गजानन कुंदे यांनी अशोक भोबे यांच्यावर 160 मतांनी विजय मिळविला

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Margao Session Court: वेश्याव्यवसाय प्रकरणी दोषी ठरलेल्या विजय सिंग याला गुरुवारी ठोठावली जाणार शिक्षा

Canacona: तपासणी टाळण्यासाठी समुद्रातून मद्य तस्करी; काणकोण येथे एकाला अटक

Goa SSC Result Declared: यंदाही मुलीच हुश्शार, गोव्यात दहावीचा 92.38 टक्के निकाल

Xeldem Assault Case: आंब्यावरुन मारहाण, सोनफातर - शेल्‍डे येथे बागमालकास जीवे मारण्याची धमकी

Goa Today's Top News: दहावीचा निकाल, अपघात, चिरे खाणीवर छापा; गोव्यातील बातम्यांचा आढावा

SCROLL FOR NEXT