Goa culture Dainik Gomantak
गोवा

गोमंतभूमीला मोठा सांस्कृतिक वारसा: प्रा. नेसरकर

गोवा मराठी अकादमीतर्फे डिचोलीत एक दिवसीय मराठी सांस्कृतिक मेळावा

दैनिक गोमन्तक

डिचोली: संस्कृती ही श्रेष्ठ असून, आपले सण-उत्सव यातून संस्कृतीचे दर्शन घडत असते. संस्कृती माणसांना जोडायला शिकवते. निसर्गसौंदर्याने नटलेली गोमंतभूमी ही सांस्कृतिक संचिताने समृद्ध अशी भूमी आहे. गोमंतभूमीला मोठा सांस्कृतिक वारसा लाभला असून, ही भूमी प्रत्येकाला आपलीशी वाटते, असे उद्‍गार बेळगावच्या राणी चन्नमा विद्यापीठाच्या मराठी विभाग प्रमुख प्रा. मनिषा सुबराव नेसरकर यांनी काढले.

गोवा मराठी अकादमी डिचोली प्रभागाच्यावतीने डिचोलीत एक दिवसीय सांस्कृतिक मेळावा घेण्यात आला. या मेळाव्याचे उद्‍घाटन प्रा. नेसरकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्रा. अनिल सामंत, कार्यकारिणी सदस्य प्रा. पौर्णिमा केरकर, सूर्यकांत देसाई आणि प्रा. सोमनाथ पिळगावकर उपस्थित होते.

प्रा. सामंत यांनी संस्कृतीबद्दल विवेचन करताना छत्रपती शिवाजी महाराज हे पराक्रमी कणा तर संत ज्ञानेश्वर म्हणजे विचारांची वीणा असल्याचे नमूद केले. प्रा. पौर्णिमा केरकर यांनी प्रास्ताविक केले. स्नेहा सुतार यांनी सूत्रसंचालन केले. सूर्यकांत देसाई यांनी आभार मानले.

‘शब्दसुरांशी जडले नाते’

उद्‍घाटन सत्रानंतर ‘शब्दसुरांशी जडले नाते’ या विषयावरील परिसंवाद रंगला. या परिसंवादात विजयकुमार वेरेकर (विज्ञान), गजानन देसाई (साहित्य), स्नेहा पुणेकर (नाटक) आणि अर्जुन परब (कला) हे मान्यवर सहभागी झाले होते. प्रा. सोमनाथ पिळगावकर आणि वर्षा धुपकर या परिसंवादाचे संवादक होते. दुपारी तरुणाईच्या विविध कलागुणांचा आविष्कार घडविणारा ‘युवाविष्कार’ हा कार्यक्रम रंगला.

‘काव्यगंध’ दरवळला

दुपारच्या सत्रात गुरुप्रसाद कापडी यांच्या अध्यक्षतेखाली ‘काव्यगंध’ हे कविसंमेलन रंगले. यात चंद्रकांत गवस, डॉ. प्रवीण सावंत, तनुजा नेवगी, चंद्रलेखा (बबिता) गवस, तृप्ती बांदेकर, मीना कानोळकर, संजीव आजगावकर, रुबीना शेख, स्मिता गाड, विठ्ठल भगत, श्रृष्टी नाईक, इंदू परब, साधना आरोंदेकर, मुकुंद मळगावकर, शुभलता कळंगुटकर, गौरी नाडगौडा आणि श्रद्धा देसाई सहभागी झाल्या होत्या.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

T20 World Record: 22 षटकार, 17 चौकार… टी20 क्रिकेटमध्ये ठोकलं 'द्विशतक', 140 किलो वजनाच्या खेळाडूनं घातला धुमाकूळ; गोलंदाजांच्या उडवल्या चिंधड्या

Strait of Hormuz: इराणचा अमेरिकेला 'डिजिटल' दणका! होर्मुजच्या सामुद्रधुनीतील इंटरनेट केबल्सवर नियंत्रण मिळवण्याची तयारी; जागतिक दळणवळण धोक्यात

Shani Gochar 2026: शनीदेवाचा रेवती नक्षत्रात धमाका! 2 जुलैपासून 'या' 3 राशींना लागणार लॉटरी; उत्पन्नात होणार मोठी वाढ

पेडण्यात सिंधुदुर्गची ताजी मासळी, रखडलेल्या प्रकल्पामुळे सुविधांचा अभाव; ग्राहकांचा नाईलाज

Goa Assembly Election 2027: गोव्यात आगामी सरकार काँग्रेसचेच! अमित पाटकरांनी व्यक्त केला विश्वास; केरळ, तमिळनाडू विजयाबद्दल काँग्रेसकडून जल्लोष

SCROLL FOR NEXT