दाडाचीवाडी-धारगळ येथे आगीत आंबा व काजू बागा पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. ही घटना संध्याकाळी उशीरा घडली आहे. स्थानिक शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, धारगळ येथील स्पोर्ट्स सिटी हद्दीत आग (fire) लागली आणि त्या आगीने राैद्ररूप धारण केले. आगीत दोन लाख चौरस मीटरपेक्षा जास्त जागेवर लावलेली झाडे पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे (Farmers) मोठे नुकसान झाले आहे. हाता-तोंडाशी आलेला घास या आगीने हिसकावल्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. तसेच सरकारकडे (Government) मदतीची अपेक्षा करत आहे. (Mango and cashew plantations were completely destroyed in a fire at Dadachwadi Dhargal)
दरम्यान, दत्तवाडी-म्हापसा येथील श्रीदत्त मंदिराजवळील चार घरांना सोमवारी (13 एप्रिल) मध्यरात्री अचानक आग लागून सुमारे सहा लाख रुपयांची मालमत्ता जळून खाक झाली होती. अग्निशामक दलाच्या जवानांनी चार बंबांच्या साहाय्याने झुंज देत सुमारे तीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आणली.
म्हापसा अग्निशामक दलाला रात्री 12.40 च्या सुमारास आगीची माहिती मिळाल्यानंतर आग विझवण्यास सुरूवात झाली. म्हापसा येथाल दोन तसेच पर्वरी व पणजी येथील प्रत्येकी एक बंब घटनास्थळी आला व रात्री साडेतीनच्या सुमारास आग विझवण्यात आली होती.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.