Mandrem Panchayat Water Permit Dainik Gomantak
गोवा

Mandrem: मांद्रेत अजब अट घालून व्हिला, फ्लॅट्सना परवाने! पंचायत क्षेत्रातील पाणी न वापरण्याचे शपथपत्र; नागरिकांत आश्‍चर्य

Mandrem Panchayat Water Permit: परवाने देताना केवळ पंचायत क्षेत्रातील पाणी वापरणार नाही, असे शपथपत्र घेऊन पंचायतीने काय साध्य केले, असा प्रश्‍न सध्या उपस्थित केला जात आहे.

Sameer Panditrao

हरमल: मांद्रे पंचायत क्षेत्रातील पाणी वापरणार नाही, असे शपथपत्र घेऊन व्हिला व फ्लॅट्सना परवाना दिल्याचे सरपंच राजेश मांद्रेकर यांनी सांगितल्याने पंचायतीच्या या कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार म्हणजे ग्रामस्थांच्या तोंडाला पाने पुसण्याचा प्रकार असल्याचे काही ग्रामस्थांनी सांगितले.

मांद्रे पंचायत क्षेत्रात १८ व्हिलास व ५० पेक्षा जास्त फ्लॅट्स उभारण्यास पंचायतीने परवाने दिल्याचे सरपंच मांद्रेकर यांनी सांगितले. मागील पंचायत मंडळाने ३८ व्हिलाना परवाने दिले होते, मात्र आपल्या काळात दिलेल्या परवानग्याबाबत अनावश्‍यक सोशल मीडियावर चर्चा झाली. तसेच मोर्चा काढण्याचे तसेच निवेदने देण्याचे प्रकार घडल्याचे ते म्हणाले.

दरम्यान, परवाने देताना केवळ पंचायत क्षेत्रातील पाणी वापरणार नाही, असे शपथपत्र घेऊन पंचायतीने काय साध्य केले, असा प्रश्‍न सध्या उपस्थित केला जात आहे. नगर नियोजन खाते व अन्य खात्याकडून आवश्यक दाखले असले तरी पंचायतीने असे शपथपत्र घेण्याचे कारण काय, असाही प्रश्न केला जात आहे.

या शपथपत्राला काही कायदेशीर मान्यता आहे का की केवळ वेळ मारून नेण्याचा हा प्रकार आहे, अशीही शंका उपस्थित केली जात आहे. ग्रामस्थ प्रदीप सावंत यांनी अशा प्रकारामागील अर्थपूर्ण व्यवहार जनतेला ठाऊक आहेत. पदावरून पायउतार झाल्यानंतर त्या पंचाची आर्थिक स्थिती दिसून येते. निदान सरपंचपदाची तरी शान घालवू नये.

लोकांना शेंडी लावण्याचा प्रकार

याबाबत गट काँग्रेस समितीचे अध्यक्ष रेडकर यांनी सांगितले की, सद्यःस्थितीत पंचायतीपेक्षा पंच साधन गटातील मतदार बनले आहेत. प्रभागातील मतदारांना शेंडी लावण्याचे काम ते योग्य पद्धतीने करीत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मोपा विमानतळावर कस्टम विभागाची मोठी कारवाई! 3.16 कोटींचा अंमली पदार्थ जप्त; बँकॉकहून आलेल्या प्रवाशाला बेड्या

Rivona: सफर गोव्याची! पांडवांचा पदस्पर्श लाभलेले, देवदेवतांची प्राचीन मंदिरे असणारे तपस्वींचे ऋषीवन; हिरवेकंच 'रिवण'

Youth Migration: भारतीयांना खुणावतेय परदेशातील करिअर! 52 टक्के तरुणांचा देश सोडण्याचा विचार; 'टर्न ग्रुप'चा खुलासा

किंग कोहली अन् रोहितच्या फौजेचं व्यवस्थापन आता गोमंतकीयाच्या हाती, महेश देसाईंची टीम इंडियाच्या व्यवस्थापकपदी निवड

मुंबईत मराठी माणूस खरंच श्रीमंत झाला की फक्त 'उपरा'? 25 वर्षांच्या सत्तेचा लेखाजोखा अन् वास्तव; आगामी निवडणुकीत कोणाला कौल?

SCROLL FOR NEXT