Illegal Hill Cutting in Mandrem  Dainik Gomantak
गोवा

Illegal Hill Cutting : मांद्रे आम्रपाली येथील अवैध डोंगरकापणी सरपंचांनी रोखली

मांद्रे पंचायत क्षेत्रातील जुनसवाडा आम्रपाली परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा डोंगर कापणी चालू असल्याची तक्रार स्थानिक पंचायतीकडे नागरिकांनी केली होती.

निवृत्ती शिरोडकर

Illegal Hill Cutting : मांद्रे पंचायत क्षेत्रातील जुनसवाडा आम्रपाली परिसरात मोठ्या प्रमाणात बेकायदा डोंगर कापणी चालू असल्याची तक्रार स्थानिक पंचायतीकडे नागरिकांनी केली होती. पंचायतीने संबंधितांना कागदपत्रे सादर करण्यास आज मंगळवारी दुपारी बारा वाजेपर्यंत मुदत दिली होती. परंतु संबंधिताने पंचायतीकडे कोणत्याही प्रकारचे ना हरकत दाखले किंवा कागदपत्रे सादर न केल्याने संरपंच अमित सावंत यांनी पंचायत मंडळासह घटनास्थळी जाऊन काम रोखले आणि संबंधितांना नोटीसही बजावली.

नगर नियोजन मंत्री विश्वजीत राणे हे पेडणे मतदार संघाच्या दौऱ्यावर आले असता टीसीपीचा विषय यावेळी ऐरणीवर आला होता. यावेळी पेडणे तालुक्यात मोठ्या प्रमाणात बेकायदा डोंगर कापणी सुरू आहे. त्यांच्यावर कसल्या प्रकारची कारवाई करण्यात येईल, असा प्रश्न विश्वजीत राणे यांना विचारण्यात आला होता. त्यावेळी त्यांनी संबंधितावर कडक कारवाई करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगून कुणाचीही हयगय केली जाणार नाही असे म्हटले होते. मांद्रे आम्रपाली परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी चालू असल्याचे बाब स्थानिकांनी पंचायतीच्या निदर्शनास आणून दिली होती.

याविषयी पंचायतीने संबंधितांना आज 11 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजेपर्यंत सर्व प्रकारच्या परवान्यांची कागदपत्रे पंचायतीकडे सादर करावी, अशी सूचना केली होती. पंचायतीने बांधकामासाठी किंवा डोंगर कापून एखादा प्रकल्प उभारण्यासाठी कसल्याच प्रकारचा ना हरकत दाखला दिलेला नाही. मात्र तरीही सर्रासपणे सुरु असलेल्या या डोंगरकापणीच्या विरोधात स्थानिकांनी तक्रार केल्याने सरपंच अमित सावंत यांनी घटनास्थळी जात काम बंद पाडले.

आम्रपाली परिसरात मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी सुरू असल्याच्या तक्रारी स्थानिक पंचायत मांद्रे कार्यालयात आल्यानंतर पंचायत मंडळांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली, असता एक जेसीपी यंत्र मोठ्या प्रमाणात डोंगर कापणी करत होते. त्या यंत्राला कसल्याच प्रकारचा रजिस्ट्रेशन नंबरही नव्हता. त्या ठिकाणी दोन-तीन वाहने होती. ती वाहने सरपंच अमित सावंत यांनी पोलिसांच्या स्वाधीन केली.

सरपंच अमित सावंत यांनी याविषयी माहिती देताना सांगितले की, आम्रपाली परिसरात बेकायदा डोंगर कापणी सुरू असल्याच्या तक्रारी मांद्रे पंचायतीकडे आल्या होत्या. संबंधितांना कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदत दिली होती. परंतु मुदतीत कागदपत्रे आली नसल्याने पंचायत मंडळाने काम रोखले आहे. शिवाय कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे. अशा बेकायदा बांधकामांना कधीच पंचायत थारा देणार नसल्याचेही सरपंच अमित सावंत यांनी यावेळी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ट्रेनच्या खिडकीतून बाहेर लटकणारे पाय अन्...'; चिमुकलीच्या व्हिडिओनं खळबळ; सोशल मीडियावर थरकाप व्हायरल

Sanjay Dutt Luxury Hotel In Goa: संजय दत्तचं गोव्यात आलिशान लक्झरी हॉटेल, उद्घाटनापूर्वीच रचला इतिहास; आंतरराष्ट्रीय स्तरावर ठरतंय चर्चेचा विषय

Vaidhriti Yoga: ऑफिसमध्ये वाद अन् प्रवासात नुकसान! सूर्य-चंद्राची अशुभ युती उडवणार झोप; वैधृती योग 'या' राशींसाठी ठरणार घातक

Delhi Student Protest: मुलांचा आक्रोश, अमानुष अत्याचार अन् रक्ताळलेलं 'आंदोलन'! शिक्षणातील लाल फितीविरुद्ध 'जेन-झी'चा आरपारचा रणसंग्राम

Anti Defection Law: सत्तेची चिता पेटवण्यासाठी निष्ठेचा बळी? राजकीय पक्षांतराच्या अनैतिक नाट्यावर ताशेरे; आमदार पळवणाऱ्या वृत्तीमुळे प्रादेशिक पक्षांचे अस्तित्व धोक्यात

SCROLL FOR NEXT