Goa In BJP
Goa In BJP Gomantak Digital Team
गोवा

Goa In BJP : दयानंद सोपटेंच्‍या ‘त्‍या’ वक्तव्‍यामुळे मांद्रेत संभ्रम वाढला

गोमन्तक डिजिटल टीम

निवृत्ती शिरोडकर

विधानसभा निवडणुकीला अजून चार वर्षांचा अवधी आहे. मात्र लोकसभा निवडणूक वर्षभरात होणार आहे. त्याच अनुषंगाने हल्लीच भाजपचे मांद्रे मतदारसंघाचे माजी आमदार दयानंद सोपटे यांनी ‘भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना येण्यास आपली हरकत नाही. श्रेष्‍ठींनी जर त्यांना पक्षात घेतले तर त्यांचे आपण स्वागतच करतो’ असे वक्तव्य करून आपले लक्ष वेधून घेतले आहे.

त्यामुळे येणाऱ्या काळात मांद्रे मतदारसंघात राजकीय घडामोडी आणि समीकरणे बदलतील, अशी चिन्‍हे दिसू लागली आहेत. शिवाय कार्यकर्त्यांमध्‍ये संभ्रम निर्माण झाला आहे. माजी मुख्यमंत्री प्रा. लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी 2022 च्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजप पक्ष सोडला आणि त्यांनी त्‍या पक्षाच्‍याविरोधातच मांद्रे मतदारसंघातून अपक्ष उमेदवारी दाखल करून भाजपच्या उमेदवाराचा पराभव घडवून आणला.

मगोचे उमेदवार जीत आरोलकर यांना लोकप्रतिनिधित्व बहाल करण्यास त्‍यांनी मदत केली. आरोलकर जरी निवडून आले तरी सत्तास्थानी असलेल्या भाजपमध्ये ते सामील झाल्यामुळे सध्या विरोधी पक्षाची भूमिका कोण निभावणार, असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सोपटे यांनी माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर हे भाजपमध्‍ये आले तर त्यांच्यासोबत जुनेजाणते भाजप कार्यकर्ते पक्षात येतील आणि पक्ष बळकट होऊन भाजपलाच फायदा होईल, असे म्‍हटले आहे. मात्र असे घडले तर राजकीय समीकरणांना वेग मिळेल आणि चित्र बदलून शेवटी भाजपलाच पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी मिळविण्यास संघर्ष करावा लागण्‍याची शक्‍यता आहे.

भाजपमध्‍ये अजूनही दोन गट

मांद्रे मतदारसंघात अजूनही भाजपमध्‍ये दोन गट कार्यरत आहेत. माजी आमदार दयानंद सोपटे आणि माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांचे समर्थन करणारे हे गट होय. हे दोन्ही गट आणि दोन्ही नेते एकत्र आले तरच भाजपला पुन्हा या मतदारसंघात यश मिळू शकते. त्या प्रकारचे वातावरण सध्या तरी तयार झालेले आहे. लोकसभा निवडणुकीत मांद्रेतील मतदारांचा कौल भाजपच्या बाजूने लागण्यासाठी त्‍या पक्षाच्‍या नेत्यांनी आमदार जीत आरोलकर यांच्यावर दबाव टाकायला सुरूवात केली आहे. भाजप-मगो हे युतीचे सरकार सत्तेवर असल्यामुळे हा दबाव आणखी वाढणार आहे.

पक्षाची ताकद वाढेल

भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्यांना येण्यास आपली हरकत नाही. श्रेष्‍ठींनी जर त्यांना पक्षात घेतले तर त्यांचे आपण स्वागतच करतो. कारण अशा जुन्‍याजाणत्‍या नेत्‍यांमुळे त्‍यांचे कार्यकर्तेही भाजपमध्‍ये येतील आणि पक्षाची ताकद आणखी वाढण्‍यास मदत होईल.

दयानंद सोपटे, माजी आमदार, मांद्रे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT