Jeet Arolkar Dainik Gomantak
गोवा

Arambol: 'जमीन रूपांतरास आपला पूर्ण विरोध'! आमदार आरोलकरांचे प्रतिपादन; हरमलवासीयांसोबत राहणार असल्याचा केला दावा

Jeet Arolkar: हरमल भागातील जागृत नागरिक, पर्यावरण प्रेमींनी मशाल मिरवणूक काढली होती. त्या संदर्भात आमदार जीत आरोलकर यांना छेडले असता त्यांनी वरीलप्रमाणे ग्वाही दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

मोरजी: मांद्रे मतदारसंघातील पर्यायाने पेडणे तालुक्यातील कोणत्याही जमीन रूपांतरणास आपला तीव्र विरोध असून त्या संदर्भात आपण मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याला लेखी पत्र पाठवले आहे. हरमलवासीयांनी उभारलेल्या चळवळीस पूर्ण पाठिंबा आहे, अशी ग्वाही मांंद्रेचे आमदार जीत आरोलकार यांनी दिली. हरमल येथील रूपांतरीत जमीन पूर्वीप्रमाणे झोन होत नाही. तोपर्यंत आपण हरमलवासीयांसोबतच राहू,असा पुनरुच्चारही त्यांनी यावेळी केला.

हरमल डोंगर, माळरानावर एकूण तीन लाख चौरस मीटर जागा बिगर गोमंतकीयांनी विकत घेऊन ‘चेंजिंग झोन’ केल्याप्रकरणी हरमल भागातील जागृत नागरिक, पर्यावरण प्रेमींनी मशाल मिरवणूक काढली होती. त्या संदर्भात आमदार जीत आरोलकर यांना छेडले असता त्यांनी वरीलप्रमाणे ग्वाही दिली.

आरोलकर पुढे म्हणाले, जमीन रूपांतर करण्यास आमचा तीव्र विरोध आहे, याही पुढे असेल. त्यासाठी गतवर्षी मांद्रेतील जागृत नागरिकांनी मिळून जन आंदोलन उभारले होते. त्यानंतर आपण स्वतः मुख्यमंत्री तसेच संबंधित खात्याला निवेदन सादर करून यापुढे कोणत्याही जमिनी रूपांतरित करण्यास हरकत असेल, असे स्पष्ट केले होते. आजही जमीन रूपांतरित करण्यास तीव्र विरोध आहे, असा पुनरुच्चार आरोलकर यांनी केला.

आमदार आरोलकर म्हणाले, विधानसभेत ४० आमदार आहेत, मात्र जमीन रूपांतरणाविषयी आपण एकमेव आमदार विधानसभेत आवाज उठवत आहोत. टीसीपी मंत्र्यांनाही आपण यावर बोललो आहोत. जर खात्याने तसा रूपांतरित जमीन केली असेल तर त्या अधिकाऱ्याने त्या जमिनीच्या परिसरात येऊन ती कशा प्रकारची जमीन आहे, पाहणी करायला हवी,असेही ते म्हणाले.

पर्यावरणस्नेही विकास करा!

आमदार जीत आरोलकर म्हणाले, जर कुणाला विकास करायचा असेल, तर पर्यावरणस्नही पद्धतीने विकास करायला हवा. त्या ठिकाणी चांगल्या प्रतीचे पर्यटक येतील याची जबाबदारी घ्यावी. त्यासाठी आम्ही प्रस्ताव सरकारला दिलेला आहे, असेही ते म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

BJP Mission 2027: भाजपचे 'मिशन 2027'; जल-जंगल-जमिनीपेक्षा 'मतव्यवस्थापन' ठरणार निर्णायक, उमेदवारांच्या निवडीवरही मोठी नजर

SCROLL FOR NEXT