Mandre|Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa News: वीज वाहिन्यांसाठी खोदकाम सुरु; जलवाहिन्या फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाया

मांद्रेत रात्री-अपरात्री रस्ते खोदणे चालू असल्याने मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार चालू आहेत.

दैनिक गोमन्तक

Goa News: मांद्रे मतदारसंघात ठिकठिकाणी भूमिगत वीज वाहिन्या टाकण्याचे काम युद्धपातळीवर सुरु असल्याने त्याचा वाहतुकीवर जसा परिणाम होत आहे. त्याही पेक्षा जेसीबीने ठिकठिकाणी रात्री-अपरात्री रस्ते खोदणे चालू असल्याने मोठ्या प्रमाणात जलवाहिन्या फुटण्याचे प्रकार चालू आहेत.

त्याचा फटका नागरिकांना बसत आहे. फोडल्या जाणाऱ्या जलवाहिन्यांमुळे पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असून नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे.

मंगळवारी रात्री 11 वाजण्ययाच्या सुमारास आगरवाडा येथील सार्वजनिक गणेश पूजन स्थळापासून जवळच रस्त्याच्या मध्यभागी भूमिगत वीज केबल्स टाकण्यासाठी जेसीबीने रस्ता खोदण्याचे काम चालू असताना मोठी जलवाहिनी फुटली.

त्यामुळे रस्त्यावर पाण्याचे ओहळ वाहू लागले. प्रचंड प्रमाणात जलवाहिन्यांतून पाणी बाहेर पडू लागल्याचे दृष्य जवळ जवळ दोन तास चालू होते. याचा त्रास वाहनचालक व नागरिकांना सहन करावा लागला.

कामगार पाण्याचा प्रवाह रोखण्याचा प्रयत्न करीत होते. रस्त्याच्या मधोमध चर खोदल्याने वाहतूकही पूर्णपणे बंद पडली होती. अखेर कामगारांनी तास-दोन तास झुंज देऊन जलवाहिन्या दुरुस्त करण्यास यश मिळवले.

रस्त्याच्या मधोमध मातीचा ढिगारा उभा करून खोदलेला रस्ता कसाबसा बुजवण्यात आला. मात्र रस्त्याच्या मध्यभागी उंचवटा राहिल्याने त्याचा फटका वाहनचालकांना बसत होता.

वाहनचालकांना मनःस्ताप

रस्ता कंत्राटदाराची मनमानी वाढत असून मांद्रे त ठिकठिकाणी एकाच वेळेला रस्ता खोदण्याचे काम चालू असल्याने वाहन कोणत्याही रस्त्याने वळविले तरी वाहन चालक अडकून पडतात. दिवसा व रात्री पूर्वसूचना न देता काम सुरू असल्याने वाहनचालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT