Makar Sankranti In Goa: मकरसंक्रांती सणाची लगबग; गोव्यात चोली बाजार फुलला

महागाईचे सावट, तरीही वाण खरेदीसाठी गर्दी दिसून येते आणि तिळगूळ, तिळाचे लाडू आदी साहित्य बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहे.
Makar Sankranti In Goa
Makar Sankranti In GoaDainik Gomantak

Makar Sankranti In Goa: ‘तिळगूळ घ्या, गोड, गोड बोला’, असा संदेश देणारा सण म्हणजे मकरसंक्राती. हिंदू संस्कृतीत अनन्यसाधारण महत्त्व असलेला मकरसंक्रांती सण चार दिवसांवर आल्याने, सध्या डिचोलीत सर्वत्र या सणाची लगबग सुरू झाली आहे.

मकरसंक्रांती म्हणजे नववधूसह सुवासिनींचा उत्साह द्विगुणित करणारा सण. मकरसंक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत बहुतेक घरोघरी हळदीकुंकू साजरा करण्यात येतो.

हा सण जवळ आल्याने आवश्‍यक साहित्याने बाजार फुलला असून, तिळगूळ, तिळाचे लाडू आदी साहित्य बाजारात विक्रीस उपलब्ध झाले आहे. मकरसंक्रांतीला लागणाऱ्या साहित्याला बाजारात मागणी वाढण्याची शक्यता असली, तरी यंदा या सणावर महागाईचे सावट आहे.

हळदीकुंकूसाठी वाण म्हणून लागणाऱ्या साहित्याची सध्या बाजारात खरेदी सुरू झाली असून, पुढील दोन दिवसांत खरेदीला जोर येण्याची शक्यता आहे.

Makar Sankranti In Goa
Goa Railway: काणकोण रेल्वे स्थानकावर थांबा द्या!

मकरसंक्रांतीला महत्त्व

नववर्षाचा पहिला सण अर्थातच मकरसंक्रांती. हा सण सूर्य देवाशी संबंधित आहे. ज्यावेळी सूर्य धनू राशीतून मकर राशीत प्रवेश करताे, त्यावेळी हा सण साजरा करण्यात येतो.

‘बुडकुल्या’ महागल्या!

या सणावर यंदा महागाईचे सावट असून, बहुतेक साहित्याचे दर 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत. प्रथमच हळदीकुंकू करणाऱ्या नवविवाहित सुवासिनींना वाण म्हणून मातीच्या ‘बुडकुल्यां’सह अणसीचे पेड, कुंकू, बांगड्या आदी पारंपरिक वस्तू द्याव्या लागतात.

यंदा ‘बुडकुल्या’ महाग झाल्या आहेत. 500 रुपये शंभर नग असे बुडकुल्यांचे दर आहेत.

Makar Sankranti In Goa
Red Cross Society: पणजीतील गौरीश धोंड यांना रेडक्रॉस सोसायटीचा सर्वोच्च पुरस्कार

भेटवस्तूही उपलब्ध

भेटवस्तूही बाजारात दाखल झाल्या आहेत. मकरसंक्रांती ते रथसप्तममीपर्यंत घरोघरी ‘हळदीकुंकू’चे कार्यक्रम आयोजित करण्यात येतात. मात्र, अलीकडच्या काळात या सणाची व्याप्ती वाढली असून, बदलत्या काळानुसार स्वरूपही बदलले आहे. भेटवस्तू देण्यासाठी स्पर्धाही वाढली आहे.

तिळाचे लाडू ‘तिखट’ : तिळगूळ, वाटाण्यांचे दर स्थिर असले तरी तीळ महाग झाले आहेत. 250 रुपये किलो असे तिळाचे दर आहेत. साहजिकच तिळाचे लाडू किंचित ‘तिखट’ झाले आहेत. अलीकडच्या काळात अन्य भेटवस्तूंप्रमाणेच कडधान्य देण्याकडे सुवासिनींचा कल आहे.

त्यामुळे 200 ग्रॅम, पाव किलो, अर्धा किलो याप्रमाणे कडधान्याची पाकिटे तसेच साबण, उदबत्ती, प्लास्टिक आणि स्टीलची छोटी भांडीही बाजारात विक्रीस उपलब्ध आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com