Nagarjuna Dainik Gomantak
गोवा

Nagarjuna: सुपरस्टार नागार्जुन यांचे गोव्यात अवैध बांधकाम; पंचायतीने दिली नोटीस

गोवा पंचायत राज कायदा 1994 अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

Pramod Yadav

दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते नागार्जुन (Actor Nagarjuna) यांचे गोव्यातील मांद्रे येथे अवैध बांधकाम सुरू होते. मांद्रे पंचायतीने हे बांधकाम बंद पाडले असून, पंचायतीने नागार्जून यांना स्टॉप वर्क नोटीस बजावली आहे. मांद्रे पंचायतीचे सरपंच अमित सावंत यांनी ही कारवाई केली आहे.

(Mandrem Panchayat Issues Stop Work Notice to famous south actor Nagarjuna)

मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते नागार्जुन यांच्या मालकीची मांद्रे पंचायतीत सर्व्हे क्रमांक 211/2 मध्ये जमीन आहे. या जागेत बेकायदा बांधकाम सुरू असल्याचे पंचायतीच्या लक्षात आले. दरम्यान, मांद्रे पंचायतीचे सरपंच अमित सांवत यांनी यांनी घटनास्थळाची पाहणी करून संबधित काम बंद पाडले. तसेच, अभिनेते नागार्जुन यांना पंचायतीने नोटीस देखील बजावली आहे.

पंचायतीने बजावलेल्या नोटीसमध्ये काय म्हटले आहे.

अश्वेवाडा, मांद्रे येथील सर्व्हे क्रमांक 211/2 B येथे अवैध बांधकाम आणि खोदकाम सुरू होते. गोवा पंचायत राज कायदा 1994 अंतर्गत पंचायत हद्दीत कोणतेही बांधकाम सुरू करण्यापूर्वी किंवा खोदकाम करताना पंचायतीची परवानगी घेणे आवश्यक आहे. दरम्यान, या बांधकामासाठी कोणतीही परवानगी घेतली नव्हती. त्यानुसार सुरू असलेले बांधकाम तात्काळ थांबवून पंचायतीने अभिनेते नागार्जुन यांना नोटीस बजावली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Dacoity in Baina: डोक्यात वार, लहान मुलीलाही मारहाण; 'रॉड' आणि 'सुरा' घेऊन 7 हल्लेखोर घरात, बायणात मध्यरात्री भीषण दरोडा

Goa ZP Election: पैंगीणमध्‍ये तिरंगी लढतीची शक्‍यता! राजकीय समीकरणे बदलू लागली; प्रचारात गोवा फॉरवर्डची आगेकूच

Porvorim: सर्वत्र धूळच धूळ! पर्वरी महामार्गावरील वाढती समस्या; वाहनचालकांसाठी प्रवास त्रासदायक

Tivrem Vargao: 2 गटांत रंगली चुरस! तिवरे–वरगावात सत्तासंघर्षाचा विस्फोट; सरपंच–उपसरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर

Horoscope: प्रॉपर्टी होणार नावावर, कामासाठी होणार प्रवास; 'या' राशींसाठी आजचा दिवस खास

SCROLL FOR NEXT