Nagarjuna Dainik Gomantak
गोवा

Nagarjuna Akkineni: सिने अभिनेते नागार्जुन यांच्या मांद्रे येथील बांधकामाची शनिवारी पाहणी

चित्रपट अभिनेते नागार्जुन राव यांनी मांद्रे पंचायत क्षेत्रातील आश्वे-मांद्रे येथील सर्वे क्रमांक 211,12 बी या जागेमध्ये बेकायदा बांधकाम सुरू केले होते.

दैनिक गोमन्तक

Mandrem: चित्रपट अभिनेते नागार्जुन राव यांनी मांद्रे पंचायत क्षेत्रातील आश्वे-मांद्रे येथील सर्वे क्रमांक 211,12 बी या जागेमध्ये बेकायदा बांधकाम सुरू केले होते. या बांधकामाला स्थगिती देण्यासाठी मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत यांनी 21डिसेंबर रोजी नोटीस पाठवली होती.

आता त्याची कार्यवाही करण्यासाठी शनिवार, 7 रोजी या बांधकामाची पाहणी करून पुढील कार्यवाहीसाठी अहवाल पाठवला जाणार आहे.

मांद्रे पंचायत क्षेत्रातील आजोबा मंदिराच्या वरच्या भागात सुप्रसिद्ध सिने अभिनेते नागार्जुन राव यांचे बांधकाम सुरू होते. ते काम 21 रोजी लेखी नोटीस पाठवून बंद केले होते.

मांद्रे मतदारसंघातील किनारी भागात आणि डोंगर माळरानावर सध्या बिगर गोमंतकीय दिल्लीतील व्यावसायिकांनी जमिनी विकत घेतल्या आहेत.

या ठिकाणी पर्यावरणाचा ऱ्हास करून बांधकामे उभी केली जात आहेत. त्याच पद्धतीने सिने अभिनेते, चित्रपट निर्माते, क्रिकेटपटूही जमिनी विकत घेऊन त्या ठिकाणी बांधकामे करत आहेत.

मांद्रेचे सरपंच ॲड. अमित सावंत म्हणाले, की मांद्रे पंचायत क्षेत्रात यापुढे कुणालाही बेकायदेशीर बांधकाम करण्यास थारा दिला जाणार नाही. ज्यांनी ज्यांनी अजून परवाने घेतलेले नाहीत, त्यांनी परवाने घ्यावेत. अन्यथा बेकायदेशीर बांधकामांविरोधात आम्हाला पावले उचलावी लागतील. डोंगर माळरानावरही बेकायदेशीर बांधकामे उभारली आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT