Manohar Airport:...तोपर्यंत साखळी आंदोलन सुरूच ठेवणार; टॅक्सी चालकांचा निर्धार

आम्ही मोटार वाहन कायद्यात जे कायदेशीर आहे, त्यानुसार मागणी करतो. त्याविषयी कोणत्याही अटी नकोत, असे आंदोलकांचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी सांगितले.
Taxi| Manohar Airport
Taxi| Manohar Airport Dainik Gomantak
Published on
Updated on

Manohar Airport: मोपा विमानतळावर विनाअट टॅक्सी काऊंटरची मागणी मान्य होईपर्यंत नागझर येथे साखळी आंदोलन सुरूच राहील, असा इशारा ‘टुगेदर फॉर मोपा’तर्फे घेतलेल्या पत्रकार परिषदेत आंदोलकांचे नेते सुदीप ताम्हणकर यांनी दिला.

यावेळी ॲड. जितेंद्र गावकर, भास्कर नारुलकर, टॅक्सी व्यावसायिक रामचंद्र गावडे, मेहुल हळर्णकर, रूपेश कांबळी, रामा वरक, प्रीतेश शेटकर, रूपेश गावस आणि इतर उपस्थित होते.

ताम्हणकर म्हणाले की, आम्ही मोटार वाहन कायद्यात जे कायदेशीर आहे, त्यानुसार मागणी करतो. त्याविषयी कोणत्याही अटी नकोत. मुख्यमंत्र्यांनी आमदारांकडे नावे देण्यास सांगितले, त्याला काहीही अर्थ नाही. ॲड. जितेंद्र गावकर, भास्कर नारुलकर यांनीही सरकारवर टीका केली.

राज्यात कॉंग्रेसचे सरकार होते, त्यावेळी डॉ. प्रमोद सावंत हे युवा मोर्चा अध्यक्ष होते. तत्कालीन मुख्यमंत्री कामत यांनी आम्हाला ‘आस्मा’ कायदा लावण्याचे जाहीर केले, तेव्हा सावंत यांनी मोर्चा काढून आम्हाला पाठिंबा दिला होता.

दुर्दैवाची गोष्ट म्हणजे तेच सावंत मुख्यमंत्री झाल्यावर न्याय्य आंदोलने चिरडण्यासाठी वावरत आहेत. मी बसगाड्यांच्या व्यवसायात आहे. वाहन कायद्याचा मला अभ्यास आहे. पण या व्यवसायाचा अनुभव व कायद्याचा अभ्यास नसलेल्यांना फसवणे सोपे होईल म्हणून मी मुख्यमंत्र्यांना मी नको आहे, असे ताम्हणकर म्हणाले.

Taxi| Manohar Airport
Arabian Sea: अरबी समुद्रात आढळली दुर्मीळ ‘ब्‍लेनविल बिक’ माशाची प्रजाती

वाहतूक खात्याने जीएमआर कंपनीला विमानतळावर किती कारची गरज आहे, असे विचारणे चुकीचे आहे. कंपनीने माहिती दिल्यावर वृत्तपत्रात जाहिरात देऊन त्यासंदर्भात गाड्यांसाठी अर्ज मागवायला हवेत.

ॲड्व्होकेट जनरलांनीही मुख्यमंत्र्यांना याबाबत चुकीचा निर्णय घेता, असा सल्ला दिला आहे. इतकेच नव्हे, तर अनेक बाबतीत ॲड्व्होकेट जनरलांचा सल्ला न मानता मुख्यमंत्र्यांनी हेकेखोरपणाने निर्णय घेतल्याची उदाहरणे आहेत. अशा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देणे राज्याच्या हिताचे आहे, अशी टीका ताम्हणकर यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com