Mandrem Ex Sarpanch Assault Case 6 Suspects Arrested
मोरजी: मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर चार रोजी आस्कावाडा-मांद्रे येथे सहाजणांच्या बुरखाधारी टोळीने खुनी हल्ला करून वाहनातून पलायन केले होते. या सहाही संशयितांना गोवा पोलिसांच्या विशेष पथकाने कारवार येथे जेरबंद केले.
या विशेष पोलिस पथकामध्ये उपनिरीक्षक विशाल मांजरेकर, नितीन नाईक, नितेश मुळगावकर, राज परब, प्रणय गावस, रूपेश आसगावकर, हरिश पालयेकर, अनिकेत सावंत आणि मडकईकर यांचा समावेश होता.
मांद्रेचे माजी सरपंच महेश कोनाडकर यांच्यावर चार डिसेंबर रोजी आस्कावाडा-मांद्रे येथे खुनी हल्ला करण्यात आला होता. जीए-०८०- के-५११९ या क्रमांकाच्या चारचाकी वाहनातून आलेल्या सहा बुरखाधारी संशयितांनी लोखंडी सळ्यांनी कोनाडकर यांच्यावर हल्ला केला होता.
त्यानंतर पोलिसांनी वाहनमालक पुंडलिक हरिजन याला अटक केली होती; परंतु इतर सहाजण हल्लेखोर फरार होते. त्यामुळे पोलिसांवर स्थानिक नागरिक तसेच पंचायत मंडळाचा मोठ्या प्रमाणात दबाव होता. याप्रकरणी वेगवेगळ्या प्रतिक्रिया ऐकायला येत असतानाच पोलिसांनी तातडीने सहाही संशयितांना अटक केल्यानंतर आता कोनाडकर यांना मारण्यासाठी सुपारी कोणी दिली, याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात कोेणी सुपारी दिली, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोनाडकर यांच्यावर खुनी हल्ला करण्यासाठी कोणी सुपारी दिली होती? त्यासंदर्भात अद्याप माहिती उपलब्ध झालेली नाही. पोलिसांच्या विशेष पथकाने विश्वनाथ हरिजन (वय ३० वर्षे, रा. जुने गोवे), सुरेश नाईक (रा. सुकूर-पर्वरी) साईराज गोवेकर (रा. पिळर्ण), फ्रँकी नाडर (रा. सांताक्रुझ), मनीष हडफडकर आणि (रा. चोडण) आणि उद्देश शेट्टी (रा. आल्तिनो-पणजी) या सहाजणांच्या कारवार येथे मुसक्या आवळल्या.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.