Goa Drug Case Dainik Gomantak
गोवा

Goa Drug Case: शाळेजवळ ड्रग्स विक्री; केरळच्या युवकाला अटक, अमलीपदार्थ विरोधी पथकाची मांद्रे येथे कारवाई

Kerala youth drug arrest Mandrem: अमलीपदार्थ विरोधी पथकाने मांद्रे येथे कारवाई करत ड्रग्स विक्री करणाऱ्या केरळमधील २७ वर्षीय कमलुद्दीन टी.एन. याला अटक केली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: अमलीपदार्थ विरोधी पथकाने मांद्रे येथे कारवाई करत ड्रग्स विक्री करणाऱ्या केरळमधील २७ वर्षीय कमलुद्दीन टी.एन. याला अटक केली. ‘अवर लेडी ऑफ रोझरी हायस्कूल’च्या परिसरातील मोकळ्या जागेत तो अंमली पदार्थांची विक्री करत असल्याचे उघड झाले. त्याच्याकडून सुमारे ५० हजार रुपयांचा अंमली पदार्थांचा साठा तसेच ९ हजार रुपये रोख जप्त करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, २३ एप्रिल २०२६ रोजी रात्री उपनिरीक्षक दिनदयाल रेडकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मांद्रे येथे सापळा रचला. रात्री ८.२० वाजता सुरू झालेली कारवाई २४ एप्रिल रोजी पहाटे २.१५ वाजेपर्यंत चालली.

दोन स्वतंत्र पंचांच्या उपस्थितीत संशयिताची झडती घेण्यात आली असता त्याच्याकडून विविध प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या प्रकरणी संशयिताविरुद्ध एनडीपीएस कायद्याच्या कलम २२(ब) व २०(ब)(२)(ए) अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गिरीश पाडलोसकर करत आहेत.

हॉटेलमध्ये नोकरी, पर्यटकांना पुरवठा

कमलुद्दीन हा एका हॉटेलमध्ये किचन सुपरव्हायझर म्हणून काम करत होता. मात्र, तो पर्यटक तसेच स्थानिकांना ड्रग्स पुरवत असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. त्याच्याकडून हायड्रोपोनिक गांजाचा साठा मिळाल्याने हे अंमली पदार्थ हाय-टेक पद्धतीने कुठे पिकवले जात होते, याचा तपास पोलीस करत आहेत.

गांजा आणि ‘एलएसडी’ जप्त

पोलिसांनी संशयिताकडून सुमारे २० हजार रुपयांचा ५.५ ग्रॅम हायड्रोपोनिक गांजा, २२ हजार रुपयांच्या पाच गुलाबी रंगाच्या एक्स्टसी गोळ्या (२.२ ग्रॅम), ८ हजार रुपयांचे एलएसडी ब्लॉट्सचे चार नमुने (०.०६ ग्रॅम) तसेच ९ हजार रुपये रोख जप्त केले. याशिवाय गुन्ह्यात वापरलेली स्कूटरही जप्त करण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT