Goa Weather Update: गोव्यात उन्हाचा 'हिट'मॅन! सलग 3 दिवस पारा 35 अंशांवर, नागरिक उकाड्याने हैराण

Goa Weather: राज्यात उष्म्याचा कडाका अतिशय वाढला असून ही स्थिती पुढील दोन-तीन दिवस अशीच कायम राहणार.
Goa Weather Update
Goa Weather UpdateDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात उष्म्याचा कडाका अतिशय वाढला असून ही स्थिती पुढील दोन-तीन दिवस अशीच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान खात्याच्या गोवा वेधशाळेने वर्तविला आहे. मागील तीन दिवसांपासून राज्यातील कमाल तापमानाचा पारा ३५ अंशांवर कायम असून हीच स्थिती पुढील दोन-तीन दिवस कायम राहणार असल्याने नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहन गोवा वेधशाळेकडून करण्यात आले आहे.

शनिवारी राज्यात कमाल ३५ अंश सेल्सिअस तर किमान २६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली. कमाल तापमानाचा पारा देखील आता वाढला असून सामान्य तापमानाच्या तुलनेत २ अंशांनी वाढ नोंदविण्यात आली. कमाल आर्द्रताही ८९ टक्के इतकी असून सरासरीच्या तुलनेत १३ टक्के अधिक नोंदविली आहे.

शनिवारी गोव्यात दिवसभर वातावरण प्रामुख्याने उष्ण आणि दमट होते. सकाळपासूनच लख्ख सूर्यप्रकाश असल्याने तापमानात वाढ जाणवत होती. दुपारच्या वेळी उन्हाचा कडाका अधिक जाणवत होता. आर्द्रतेचे प्रमाण वाढल्यामुळे अंगाची लाही लाही होत होती. ​संध्याकाळी राज्याच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरण निर्माण झाले होते.

Goa Weather Update
Cycling Association of Goa: सायकलिंग असोसिएशनला कोर्टाचा झटका! 66 जणांचे सदस्यत्व वैध; 'मतदार वाढतील' हे कारण ठरले आक्षेपार्ह

...अशी घ्या आरोग्याची काळजी

उष्णतेपासून बचाव करण्यासाठी हलक्या रंगाचे, सैल सुती कपडे वापरावेत. घरात हवा खेळती राहण्यासाठी दारे आणि खिडक्या खुल्या ठेवाव्यात. निर्जलीकरण (डिहायड्रेशन) टाळण्यासाठी भरपूर पाणी, फळांचा रस, ताक, लस्सी किंवा इतर पातळ द्रव्यांचे सेवन करावे. उन्हात किंवा उष्ण वातावरणात शारीरिक त्रासाचे काम करणे टाळावे. फक्त आईच्या दूधावर असलेल्या मुलांना उष्म्याच्या दिवसांत जास्त वेळा दूध पाजण्याची गरज आहे.

काही भागात पाऊस

रविवारी काही भागात अवकाळी पाऊस पडला. खास करून सत्तरी परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली, त्यामुळे त्या भागात काही वेळ वीज पुरवठा खंडित झाला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com