Jeet Arolkar  Dainik Gomantak
गोवा

Mandrem: ‘मांद्रे’त होणार सिंगापूरच्या धर्तीवर विकासकामे! निवडणुकीपूर्वी चेहरामोहरा बदलण्याचे आमदार आरोलकरांचे आश्वासन

Jeet Arolkar: संपूर्ण मांद्रे मतदारसंघाचा विकास आणि काही महत्त्वाच्या रस्त्यांवरील जंक्शनचे सुशोभीकरण करून निवडणुकीपूर्वी एक वेगळाच मतदारसंघ तयार केला जाईल, अशी ग्वाही मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी दिली.

गोमन्तक डिजिटल टीम

Jeet Arolkar Promises Singapore-style Development for Mandrem

मोरजी: संपूर्ण मांद्रे मतदारसंघाचा विकास आणि काही महत्त्वाच्या रस्त्यांवरील जंक्शनचे सुशोभीकरण करून निवडणुकीपूर्वी एक वेगळाच मतदारसंघ तयार केला जाईल, अशी ग्वाही मांद्रे मतदारसंघाचे आमदार तथा गृहनिर्माण महामंडळाचे चेअरमन जीत आरोलकर यांनी दिली. खाजन गुंडो- पार्से येथील दुसऱ्या टप्प्यातील सुशोभीकरण प्रकल्पाच्या संरक्षक भिंतीची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांना त्यांनी महत्त्वपूर्ण सूचना केल्या.

तत्कालीन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी खाजन गुंडो बांधाचे सुशोभीकरण जलसिंचन खात्यामार्फत केले होते. या प्रकल्पावर चार कोटीहून अधिक खर्च केला आहे. या बांधावरील दुसऱ्या बाजूची संरक्षक भिंत आणि त्या परिसराच्या सुशोभीकरणासाठी एक कोटीपेक्षा जास्त खर्च केला जाईल. या ठिकाणी उत्कृष्ट पर्यटन स्थळ साकारण्याचा हेतू असल्याचे विद्यमान आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

यावेळी जलसिंचन खात्याचे अधिकारी अनिल परुळेकर, पार्सेचे सरपंच अजय कळंगुटकर तसेच नागरिकांनी परिसराची पाहणी केली. त्यावेळी स्थानिक पत्रकारांशी संवाद साधताना आमदार आरोलकर यांनी ही माहिती दिली. याठिकाणी पाण्याचे कारंजे उभारण्यात येणार आहेत. सांस्कृतिक, कला-क्रीडा क्षेत्राशी निगडित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध व्हावे, यासाठी या पर्यटनस्थळी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातील, असेही आरोलकर यांनी सांगितले.

सिंगापूर धर्तीवर विकासकामे

आमदार आरोलकर म्हणाले की, पुढील विधानसभा निवडणूक येण्यापूर्वी सरकारच्या माध्यमातून मांद्रे मतदारसंघाचा कायापालट करायचा आहे. वेगवेगळी पर्यटनस्थळे तयार करताना सिंगापूरच्या धर्तीवर विकासकामे केली जातील. त्यासाठी जनतेच्या सहकार्याची अपेक्षा आहे.

खाजन गुंडो बांध प्रकल्पाच्या माध्यमातून जी वायंगण शेती पडिक आहे, ती कसण्यासाठी जलसिंचन खात्याअंतर्गत वेगवेगळ्या योजना अंमलात आणल्या जातील. शेतकऱ्यांच्या समस्या प्राधान्याने सोडविल्या जातील. ज्या ठिकाणी शेतामध्ये पाणी येऊन नासाडी होते, त्यावर उपाययोजना केली जाईल.
जीत आरोलकर, आमदार, मांद्रे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's Live News: तिस्क-उसगाव येथे मध्यरात्री दुचाकीचा भीषण अपघात

Dabos Valpoi: दाबोस-वाळपई रस्ता धोकादायक अवस्थेत! खोदकामामुळे मार्गाची दुर्दशा; अपघाताची शक्यता

Navelim Bele Junction: नावेली-बेले जंक्शनवर अनेक त्रुटी, रस्ते सुरक्षा समितीकडून पाहणी; साबांखा अधिकारी मात्र अनुपस्थित

Porvorim: पर्वरीतील कोंडीत वाहतूक पोलिसांचे हाल! रखरखत्या उन्हात होते आहे होरपळ

Dodamarg Excise Building: दोडामार्ग ‘अबकारी’ कार्यालयाची दुर्दशा! छपरावर आच्छादन, फुटकी कौले; त्वरित दुरुस्तीची मागणी

SCROLL FOR NEXT