Bad Roads In Goa Dainik Gomantak
गोवा

Mandrem: मांद्रेतील रस्त्यांची खड्ड्यांमुळे चाळण! वाहनचालकांची होतेय कसरत; डिसेंबरनंतर होणार हॉटमिक्स डांबरीकरण

Mandrem Roads: जलवाहिनी व भूमिगत केबल घालताना रस्त्यांचे खोदकाम केले. ते करताना, रस्त्यांची डागडुजी नीट झाली नाही. त्यामुळे खड्डेमय स्थिती झाली.

Sameer Panditrao

मोरजी: जलवाहिनी व भूमिगत केबल घालताना रस्त्यांचे खोदकाम केले. ते करताना, रस्त्यांची डागडुजी नीट झाली नाही. त्यामुळे खड्डेमय स्थिती झाली. जोरदार पाऊस पडत असल्यामुळे तात्पुरती डागडुजी केलेली आहे. परंतु मांद्रे मतदारसंघातील सर्व रस्ते डिसेंबरनंतर हॉटमिक्स डांबरीकरण करू, असे आमदार जीत आरोलकर यांनी दिले.

आमदार आरोलकर यांनी शुक्रवार, २६ रोजी पार्से रस्त्याची पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उपरोक्त माहिती दिली.

यावेळी पेडणे सार्वजनिक रस्ता विभागाचे अधिकारी गावस, स्थानिक पंच अजित मोरजकर, स्वप्निल नाईक, पंच स्वप्निल नाईक ,पंच सुनीता बुगडे देसाई ,पाणी विभागाचे अधिकारी गौरेश ठाकूर आदी उपस्थित होते.

पार्से पंचायत क्षेत्रातील पार्से हायस्कूल ते भगवती मंदिर पर्यंतच्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात चाळण झाली होती. त्या रस्त्याची अधून मधून डागडुजी करण्याचे काम सुरू होते. परंतु सलगपणे मोठ्या प्रमाणात पाऊस पडत असल्याने कंत्राटदाराने केलेली काम पावसाने वाहून जाण्याचाही प्रकार घडला.

परिणामी लहान असलेले खड्डे त्या खड्ड्यांचा आकार दिवसेंदिवस वाढत गेला. या रस्त्यावरून वाहने चालवताना बरीच कसरत करावी लागत होती. त्या संदर्भात अनेक ग्रामस्थ नागरिकांनी सरकारकडे हा रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा, अशी मागणी केली.

त्याची दखल आमदार जीत आरोलकर यांनी घेऊन साबांखाच्या अधिकाऱ्यांना सोबत घेऊन या रस्त्याची पाहणी केली. पार्से ते आगरवाडा पर्यंत जलवाहिनी घालण्याचं काम कोजागिरी पौर्णिमा झाल्यानंतर हाती घ्यावी. अशी सूचना स्थानिक पंच अजित मोरजकर यांनी केली आहे.

दोन दिवसांत खड्डे बुजवा!

मांद्रे मतदारसंघातील रस्त्यांची स्थिती बिकट झाली आहे. या रस्त्यांची पाहणी आमदार जीत आरोलकर यांनी केली. त्यावेळी दोन दिवसांच्या आत पार्से रस्त्याला पडलेले खड्डे बुजवून रस्ता नीटनेटका करावा, असा आदेश आमदार जीत आरोलकर यांनी अधिकाऱ्यांना दिला. अधिकाऱ्यांनीही दोन दिवसांच्या आत हे सर्व खड्डे बुजवण्याचे आश्वासन दिले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Chimbel Unity Mall: वादग्रस्त युनिटी मॉल प्रकल्पाला धक्का! न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे ‘ब्रेक’; चिंबलप्रकरणी उपसंचालकांचे आदेश स्थगित

Jeromina Colaco: फुटबॉलपटू 'जेरोमिना' खेळातून राजकारणात! ‘राय’मधून उमेदवारी जाहीर; ‘आप’कडून लढवणार निवडणूक

Super Cup 2025 Final: फातोर्ड्यात रंगणार महामुकाबला! FC गोवासमोर ईस्ट बंगालचे आव्हान; सलग दुसऱ्यांदा सुपर कप राखण्याची संधी

Syed Mushtaq Ali Trophy: गोव्याचा सलग तिसरा विजय! जम्मू काश्मीरला पाजले पाणी; सुयश, कश्यपची मॅचविनिंग खेळी

Alphanso Mango Controversy: हापूस कोकणी की गुजराथी? वाद पेटला; 'वलसाड हापूस' GI मानांकनाची गुजरातची मागणी

SCROLL FOR NEXT