Mandrem Panchayat News Dainik Gomantak
गोवा

Mandrem Panchayat: मांद्रेत डोंगरकापणी रोखणार! नवनिर्वाचित सरपंचांचा विश्वास

Mandrem News: संपूर्ण पंचायत क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत; नवनिर्वाचित सरपंच मिंगेल फर्नांडिस

गोमन्तक डिजिटल टीम

Mandrem Panchayat Hill Cutting News

मोरजी: मांद्रे सरपंचपदी मिंगेल उर्फ रोजा फर्नांडिस यांची बिनविरोध निवड करण्यात आली. भविष्यात मांद्रे पंचायत क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होणाऱ्या डोंगर कापणीला आळा घालण्यासाठी पंचायत मंडळ प्रयत्न करणार असल्याचे मिंगेल यांनी निवडीनंतर सांगितले.

एकूण नऊ पंच सदस्यांनी त्यांना पाठिंबा दिला. उर्वरित आठ पंच सदस्यांना समान कार्यकाळाची विभागणी करून सरपंचपदाची संधी मिळणार आहे. २७ रोजी मांद्रे पंचायत मंडळाची विशेष बैठक आयोजित करून सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली.

त्यावेळी मिंगेल यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी नवनिर्वाचित सरपंच मिंगेल फर्नांडिस यांचे अभिनंदन केले. यावेळी मिंगेल म्हणाले की, संपूर्ण पंचायत क्षेत्राचा सर्वांगीण विकास करण्यास आम्ही प्रयत्नशील आहोत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Sport: 'स्पोर्टिंग'च्या नवोदितांकडे सर्वांच्या नजरा! चॅरिटी कपमधून गोवा फुटबॉल असोसिएशनच्या नव्या मोसमाला सुरुवात; धेंपोविरुद्ध रंगणार थरारक लढत

Goa Women Cricket: पूजा, अथश्री, निखिलाची लक्षवेधी कामगिरी! गोव्याच्या मुलींनी हिमाचल प्रदेशला 18 धावांनी नमवले; स्पर्धेतील दुसरा विजय

Allahabad High Court: 'कोठडीत आरोपीला मारहाण करणं पोलिसांची ऑफिशियल ड्युटी नाही'! हायकोर्टानं यूपी पोलिसांना फटकारलं; काय नेमकं प्रकरण?

Goa ST Reservation: जनगणनेनंतरच गोव्यात 'एसटी' आरक्षण शक्य! मायकल लोबोंचा दावा; अद्ययावत आकडेवारीशिवाय आरक्षणाला न्यायालयीन आव्हानाची शक्यता

Bardez Development: बार्देशच्या कायापालटाचा निर्धार! मायकल लोबोंकडून प्रलंबित विकासकामांना गती; रस्ते, पूल, आरोग्य केंद्रांवर विशेष भर

SCROLL FOR NEXT