Mandovi River cruise Boat fire | Colva coffee shop fire Dainik Gomantak
गोवा

Goa Fire News: मांडवी नदीत जळणाऱ्या बोटीचा थरार, कोलव्यात कॉफी शॉप भस्मभात; लाखोंचे साहित्य जळून खाक

Mandovi River Boat Fire: बिठ्ठोण येथे मांडवी नदीकाठी जेटीवर नांगरून ठेवलेली खासगी क्रुझ बोट आज शनिवारी आगीत जळून खाक झाली. या घटनेची पोलिसांत नोंद झाली.

Sameer Panditrao

पणजी: बिठ्ठोण येथे मांडवी नदीकाठी जेटीवर नांगरून ठेवलेली खासगी क्रुझ बोट आज शनिवारी आगीत जळून खाक झाली. या घटनेची पोलिसांत नोंद झाली असून, अहवाल आल्यानंतर बंदर कप्तान खाते पुढील कारवाई करेल, अशी माहिती कॅप्टन ऑक्टिवो फर्नांडिस यांनी ‘गोमन्तक''ला दिली.

जेटीवर आग लागल्यानंतर जेटीला बांधून ठेवलेला दोर जळाल्‍याने बोटीने जागा सोडली. समुद्राला ओहोटी असल्याने ती बोट वाहून उलट दिशेला आगीच्या लपेटात अडकलेल्या स्थितीत येऊन पेट्रोलपंपासमोरील कॅसिनोजवळ धडकली.

तत्पूर्वी, घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशामक दलाचे जवान बंब घेऊन बिठ्ठोणला पोहोचले. परंतु बोट विरुद्ध दिशेला जात असल्याचे पाहून दलाचे जवान पणजीत परतले आणि बोटीच्या ठिकाणी पोहोचले.

कोलवा  येथे कॉफी शॉपला आग

फोर्थवाडा-कोलवा येथे आज शनिवारी पहाटे पाचच्‍या सुमारास एका कॉफी शॉपला आग लागून आतील सर्व साहित्‍य जळून खाक झाले. या दुर्घटनेत सुमारे २५ लाखांचे नुकसान झाल्‍याचा प्राथमिक अंदाज मडगाव अग्निशामक दलाच्या कार्यालयातून व्यक्त करण्यात आला आहे. ‘वोव मोमोस’ नावाचे हे दुकान असून  आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही.

दलाचे अधिकारी गिल सोझा यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविले. नीलेश पंचवाडकर यांच्या मालकीचे हे दुकान असून त्यांनी ते वास्को येथील शॉन मोराईस यांना भाड्याने दिले आहे. आगीत तीन डीप फ्रिझर, फर्निचर, टेबल्‍स व दुकानाच्‍या शटरची हानी झाली. अधिक तपास सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Land Project: वास्कोतील सरकारी जमीन लाटण्याचा घाट! गरज पडल्यास विरोधासाठी रस्त्यावर उतरणार- जुझे फिलिप डिसोझा

Goa High Court: हॉटेल एफएआर घोटाळा: 2 आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा, अन्यथा मुख्य नगरनियोजकांना कोर्टात हजर राहावे लागेल

Goa Rough sea: बेतुल येथील फ्लोटिंग जेटी कोसळली; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, धोकादायक जेटी हटवण्याची मागणी

Meta AI Smart Glass: तुमची प्रत्येक हालचाल, प्रत्येक संवाद एआयच्या नजरेत? मेटा आणतंय 'सुपर-सेन्सिंग' चष्मा, पाहणाऱ्या-ऐकणाऱ्या गॅझेटमुळे गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह

Goa Hotel Death: फातोर्ड्यात खळबळ! नोएडातील व्यावसायिकाचा हॉटेलमध्ये संशयास्पद मृत्यू, पुढील तपास सुरू

SCROLL FOR NEXT