Mandovi River
Mandovi River Dainik Gomantak
गोवा

तिढा म्हादईचा: कर्नाटकच्या ओठात एक; पोटात एक!

दैनिक गोमन्तक

पणजी: न्यायालयाचा निकाल लागताच दुसऱ्याच दिवशी म्हादई (Mandovi River) प्रकल्पाचे काम सुरू करू, असे कर्नाटकचे पाटबंधारेमंत्री गोविंद कारजोळ यांनी म्हटले आहे, परंतु प्रत्यक्षात मात्र कळसा प्रकल्‍पातून पाणी (Water) वळविणे आणि नियोजित भांडुरा प्रकल्पासाठी आरेखन करण्याचे काम कर्नाटकने (Karnataka) जोरात सुरू केले आहे. त्यामुळे कर्नाटकातील मंत्र्यांच्या ओठात एक आणि पोटात दुसरेच असल्याचे स्पष्ट होत आहे. आम्ही न्यायालयाचा आदर राखत असल्याचे हे मंत्री सांगत असले, तरी दुसरीकडे कामाची घिसाडघाई चालवली आहे. कर्नाटक वारंवार न्यायालयाचा अवमान करीत आहे.

गेल्या कित्येक वर्षांपासून म्हादई प्रकल्‍पाचे घोडे आडले आहे. म्हादई जल लवादाने पाणी वाटप केल्‍यानंतरही कर्नाटकची तहान भागलेली नाही. बेकायदेशीररीत्या कणकुंबी येथील कळसा प्रकल्पाचे काम पूर्ण करण्यात आले असून त्यातून बेकायदा पाणी पळविले जात असल्याचा गोवा सरकारचा आरोप आहे. त्यासंदर्भातील याचिका सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे.

कर्नाटक सरकारने दोन्ही प्रकल्पांच्या कामाची घिसाडघाई चालविली आहे. भांडुरा प्रकल्पासाठी आरेखन केले जात असल्याबाबत माहिती मिळाली असून त्याची कल्पना सरकारला अनेकवेळा दिली आहे, परंतु राज्याच्या जलसंसाधन खात्यातच झारीतले शुक्राचार्य आहेत. ही बाब सरकारने गांभीर्याने न घेतल्यास भयंकर दुष्परिणामांना तोंड द्यावे लागेल. कर्नाटकच्या मंत्र्याचे वक्तव्‍य ही बनवाबनवी आहे.

- राजेंद्र केरकर, पर्यावरणप्रेमी

लवादाने कर्नाटकला 13.14 टीएमसी पाणी दिले आहे, ते आम्ही मिळविणारच. 2015 साली पर्यावरण प्रदूषण मंडळाची प्रकल्‍पांना मंजुरी मिळाली आहे, पण गोवा आणि महाराष्ट्र सरकारने हरकत याचिका दाखल केल्यामुळे काम रखडले आहे. न्यायालयीन निवाड्याची आम्ही वाट पाहात आहोत. निवाडा होताच दुसऱ्‍या दिवशी कामाला सुरवात करणार आहे.

- गोविंद कारजोळ, पाटबंधारेमंत्री, कर्नाटक

कळसा प्रकल्पाचे आरेखन सुरू

कळसाचा गळा घोटण्याचा प्रकार अजूनही सुरूच आहे. त्यावर कडी म्हणून कोणतीही पर्यावरणीय परवानगी नसताना नेरसे येथील भांडुरा प्रकल्‍पासाठी कर्नाटकने आरेखन सुरू केले आहे. दोन्ही प्रकल्प स्थळांवर कर्नाटकी अधिकाऱ्यांच्या भेटी वाढल्या आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT