Goa OTA registration mandatory X
गोवा

Goa Tourism: ऑनलाइन ट्रॅव्हल अ‍ॅग्रीगेटर्ससबाबत कडक निर्णय, 15 दिवसांत नोंदणी अनिवार्य; अन्यथा होणार कठोर कारवाई

Online travel aggregators: पर्यटन खात्याने स्पष्ट केले आहे की, निर्धारित मुदतीत नोंदणी न करणाऱ्या ओटीएंवर कठोर कारवाई केली जाईल.

Sameer Panditrao

पणजी: गोव्यातील पर्यटन व्यवहारांमध्ये पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि कायदेशीर अनुपालन सुनिश्चित करण्याच्या उद्देशाने पर्यटन खात्याने राज्यात कार्यरत असलेल्या सर्व ऑनलाइन ट्रॅव्हल अ‍ॅग्रीगेटर्ससाठी (ओटीएंनी) अधिकृत नोंदणी अनिवार्य केली आहे.

या निर्णयानुसार, गोवा पर्यटन व्यापार नोंदणी कायदा, १९८२ आणि नियम १९८५ यांच्या अधीन राहून, सर्व ओटीएंनी परिपत्रक प्रसिद्ध झाल्यापासून १५ कामकाजाच्या दिवसांत आपली नोंदणी पूर्ण करणे आवश्यक आहे.

पर्यटन खात्याने दिलेल्या माहितीनुसार पर्यटन खात्याच्या निरीक्षणात असे आढळून आले आहे की, अनेक ऑनलाइन ट्रॅव्हल अ‍ॅग्रीगेटर्स कोणतीही परवानगी, एन.ओ.सी. किंवा अधिकृत परवाना न घेता थेट ग्राहकांकडून गोव्यातील पर्यटन सेवा जसे की हॉटेल बुकिंग, ट्रान्स्पोर्ट, टूर पॅकेजेस इ.साठी ऑनलाइन बुकिंग स्वीकारत आहेत.

ही कृती कायद्याचे उल्लंघन असून, त्यामुळे राज्याच्या पर्यटन व्यवस्थापनावर परिणाम होतो. यामुळेच पर्यटन खात्याने सर्व ओटीएंना कायदेशीर चौकटीत आणण्यासाठी हे पाऊल उचलले आहे.

नव्या नियमनाचा स्वीकार करा

पर्यटन खात्याने स्पष्ट केले आहे की, निर्धारित मुदतीत नोंदणी न करणाऱ्या ओटीएंवर कठोर कारवाई केली जाईल. यामध्ये आर्थिक दंड, कारवाई आणि भविष्यकाळात गोव्यातील पर्यटन व्यवहारांमधून प्रतिबंधाची शक्यता असू शकते. गोवा सरकारने पर्यटन हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला असून, सर्व संबंधित व्यावसायिक घटकांनी कायदेशीर मार्गाने कार्य करणे अत्यावश्यक असल्याचे पुनः स्पष्ट केले आहे. यासाठी, सर्व ऑनलाईन ट्रॅव्हल अ‍ॅग्रीगेटर्सना पर्यटन खात्याच्या या नव्या नियमनाचा तत्काळ स्वीकार करणे आणि आवश्यक ती नोंदणी लवकरात लवकर पूर्ण करणे अत्यावश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim Accident: डिचोलीत भीषण अपघात! नेस्ले कंपनीच्या बसची झाडाला धडक; 7 जखमी, एकाची प्रकृती चिंताजनक

रात्रीच्या अंधारात आगीच्या ज्वाळा आणि किंकाळ्या... वृद्धाश्रमाला लागलेल्या आगीत 16 ज्येष्ठांचा होरपळून दुर्देवी मृत्यू; रुग्णालयात जखमींवर उपचार सुरु Watch Video

Arpora Nightclub Fire: पोलीस कोठडी संपली, आता न्यायालयीन कोठडी; म्हापसा कोर्टाचा लुथरा बंधूंना झटका, 9 जानेवारीपर्यंत राहावं लागणार गजाआड

4 षटक, 8 विकेट्स... बुमराह-शमीला जमलं नाही, ते 22 वर्षीय तरुणाने करून दाखवलं! विश्वविक्रम रचला Watch Video

'बहुमताचा कल पाहूनच निर्णय घेणार'; चिंबल उपोषणावर ZP गौरी कामत यांची सावध भूमिका!

SCROLL FOR NEXT