goa chess competition  Dainik Gomantak
गोवा

U19 Chess Competition: मंदार, श्रिया यांना बुद्धिबळ विजेतेपद! राज्यस्तरीय 19 वर्षांखालील स्पर्धेत अपराजित घोडदौड

Goa Chess Competition: श्री गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे डिचोली तालुका बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने घेतलेली स्पर्धा मये पंचायत सभागृहात झाली.

Sameer Panditrao

पणजी: मंदार लाड याने सर्व सातही डाव जिंकून १९ वर्षांखालील गोवा राज्यस्तरीय १९ वर्षांखालील खुल्या बुद्धिबळ स्पर्धा-निवड चाचणीत अजिंक्यपदास गवसणी घातली. मुलींच्या गटात श्रिया पाटील हिने अपराजित खेळ करताना सहा फेऱ्यांतून साडेपाच गुणांसह विजेतेपद प्राप्त केले.

श्री गणेश कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळातर्फे डिचोली तालुका बुद्धिबळ संघटनेच्या सहकार्याने घेतलेली स्पर्धा मये पंचायत सभागृहात झाली. खुल्या गटात राजवीर पाटील सहा गुणांसह उपविजेता ठरला, तर रुबेन कुलासो याने तिसरा क्रमांक मिळविला. मुलींत अन्वी देसाई व इसरा रिकार्टी यांचे समान साडेचार गुण झाले. टायब्रेकर गुणांत अन्वी हिला उपविजेतेपद, तर इसरा हिला तिसरा क्रमांक प्राप्त झाला.

खुल्या गटात चैतन्य गावकर, शुभ बोरकर, मयुरेश देसाई, ह्रदय मोरजकर, अर्थव शिरोडकर, आर्यव्रत नाईक देसाई, अर्थ करापूरकर, व्हिवान कदम, निर्भय गावडे, सार्थक नाईक, रेझमन फर्नांडिस, व्हिवान तारी, अथर्व घाटवळ, सरस पोवार, अर्णव धोटे, चैतन्य पाटील, आर. साई प्रभाकरन, नक्ष सिनारी, राम गावस, प्रचेत मालवणकर, अथर्व परब, कनिष्क सावंत यांना बक्षीस मिळाले.

मुलींच्या गटात सयुरी नाईक, वैष्णवी परब, स्कायला रॉड्रिग्ज, कृतिका अगरवाल, आर्या डुबळे, लिया सिल्वेरा, सान्वी रेडकर, यज्वरी शेट्ये, जिज्ञासा गावस, वानिया दुकळे, शिवन्या राव, शिनेल रॉड्रिग्ज, आराध्या सावंत, नव्या नार्वेकर, अस्मी तेर्से, ईशा सावंत, अदिती कामत, आयुषी गावस, त्रिशा शेट्ये यांना बक्षीस प्राप्त झाले.

बक्षीस वितरण समारंभास गोवा बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष महेश कांदोळकर, डिचोली तालुका बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष राजन कडकडे, प्रदीप शिरोडकर, सुचित्रा शिरोडकर, अरविंद म्हामल, सत्यवान हरमलकर, तुकाराम शेट्ये, प्रवीण सावंत, गणेश शेट यांची उपस्थिती होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News: क्रीडा आणि संस्कृती मंत्र्याविना होणार पावसाळी अधिवेशन; गोवा मंत्रिमंडळात अधिवेशनानंतर फेरबदल

IND Vs ENG: जडेजाच्या 'त्या' निर्णयामुळे भारत हरला? अनिल कुंबळे म्हणतात...

इंग्लंडमध्ये '1947' च्या आठवणी ताज्या, राजीव शुक्लांनी किंग चार्ल्सना दिले 'स्कार्स ऑफ 1947' पुस्तक भेट!

Viral Video: दुधसागर धबधब्याचा नयनरम्य व्हिडिओ व्हायरल, निसर्गाची किमया पाहून तुम्हीही थक्क व्हाल!

Digital India Reel Contest: 'रील' बनवायला आवडतंय? दाखवा तुमचं टॅलेंट आणि जिंका 15,000 रुपये, केंद्र सरकारचा भन्नाट उपक्रम वाचा

SCROLL FOR NEXT