विश्वविजेत्या डी गुकेश याने नॉर्वे ओपन स्पर्धेत क्लासिकल डावात जागतिक क्रमवारीतील अव्वल मॅग्नस कार्लसनचा पराभव केला. नॉर्वे ओपनच्या सहाव्या फेरीत गुकेशने हा विजय मिळवला. क्लासिकलमध्ये गुकेशचा हा कार्लसनवरील पहिलाच विजय ठरला. १९ वर्षीय गुकेश स्पर्धेच्या इतिहासात कार्लसनला हरवणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला, याआधी रमेशबाबू प्रज्ञानंदाने कार्लसनला हरवले होते. या विजयासह, डी गुकेश नॉर्वे बुद्धिबळ २०२५ च्या गुणतालिकेत ८.५ गुणांसह तिसऱ्या स्थानावर पोहोचला आणि आता तो कार्लसन आणि अमेरिकेच्या फॅबियानो कारुआनापेक्षा फक्त एक गुण मागे आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.