Goa News Dainik Gomantak
गोवा

Curchorem Helmet Man: डोक्यावर हेल्मेट, अंगावर कपडे नाही; कुडचड्यात नग्नावस्थेत फिरून महिलांना करतोय लक्ष्य; Video Viral

Goa Latest News: शेल्डे कुडचडे येथे अंधारात लपून बसलेल्या या व्यक्तीने दुचाकीवरुन घरी चाललेल्या महिलेच्या समोर अचानक येत भीती दाखवली.

Pramod Yadav

Curchorem Helmet Man Viral Video

कुडचडे: कुडचडे आणि केपेच्या सामेवरील गावातील रस्त्यावर नग्नावस्थेत फिरणाऱ्या एका विकृत तरुणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या विकृत तरुणाने डोक्यावर हेल्मेट घातला असून या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. केपे येथील एका गावात ५ ते ६ फेब्रुवारी रोजी रात्रीच्या सुमारास या तरुणाने दुचाकीवरून जाणाऱ्या महिलेला पकडण्याचा प्रयत्न केला असे दावा स्थानिकांनी केला आहे.

याप्रकरणी समोर आलेल्या अधिक माहितीनुसार, केपे येथे रात्रीच्या वेळी एक नग्न व्यक्ती रात्री एक ते दोनच्या सुमारास रस्त्यावर फिरत असून त्याने डोक्यावर हेल्मेट घातल्याने त्याचा चेहरा दिसलेला नाही. पण संबंधित विकृत तरुण हा दुचाकी किंवा पायी जाणाऱ्यांना महिलांना गाठून घाबरवत असल्याचा दावा स्थानिक करतायंत.

सीसीटीव्ही व्हिडिओत काय दिसतंय?

केपे येथील एका गावात अंधारात लपून बसलेल्या या व्यक्तीने दुचाकीवरुन घरी चाललेल्या महिलेच्या अचानक समोर येत भीती दाखवली. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

दरम्यान, संबंधित तरुण हा मनोरुग्ण असल्याचा दावा देखील केला जात आहे. तरुण अनोळखी असून, यापूर्वी तो परिसरात दिसलेला नाही. गेल्या काही दिवसांपासून असा प्रकार सुरु असल्याचा दावा केला जात आहे. याप्रकरणी पोलिसांत अद्याप तक्रार दाखल झालेली नाही. पण केपे पोलिसांनी या घटना घडलेल्या परिसरात गस्त घालण्यास सुरुवात केलीय. पोलिस अधिक तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT