Palolem Beach Dainik Gomantak
गोवा

Palolem Beach: पुन्हा बीच आणि बाईक, पाळोळे समुद्र किनाऱ्यावर नियमांचे उल्लंघन

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर वाहन घेऊन जाण्यास मनाई आहे.

Pramod Yadav

Palolem Beach: गोव्यात येणारी काही पर्यटक नियमांना धाब्यावर बसवून नसते धाडक करत असतात. दुचाकीवरुन जीवघेणे स्टंट करणे असो की नियमांचे उल्लंघन करुन चुकीचे प्रकार करण्याचा प्रयत्न वारंवार अशा घटना समोर आल्या आहेत.

राज्यातील समुद्रकिनाऱ्यांवर वाहन घेऊन जाण्यास मनाई आहे. तरी काही अतिउत्साही पर्यटक नियमांकडे दुर्लेक्ष करुन बीचवर दुचाकी घेऊन जातात.

अशीच एक घटना दक्षिणेतील प्रसिद्ध पाळोळे बीचवरुन आली आहे. एक व्यक्ती पाळोळे बीचवर दुचाकी घेऊन वावरताना दिसत आहे. खासगी मालकी असणारी ही दुचाकी कर्नाटक परवाना असलेली आहे.

समुद्राच्या पाणी पातळीच्या अगदी जवळून हा व्यक्ती दुचाकी चालवत असून, स्वत:सह इतरांचा जीव देखील धोक्यात घालताना दिसत आहे. दरम्यान, दुचाकीवरील व्यक्ती पर्यटक आहे की स्थानिक याबाबत माहिती समोर आलेली नाही.

यापूर्वी देखील अशाप्रकारच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. पोलिसांनी अशा घटनांची गंभीर दखल घेऊन वारंवार कारवाई देखील केली असून, नियमांचे उल्लंघन करु नये असे आवाहन केले आहे.

दरम्यान, सरकार आणि प्रशासनाकडून वारंवार सूचना करुन देखील लोकांकडून असा बेफिकीरपणा केला जात असल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

"कोळसा वाढणार असे स्वप्न कोणाला पडलेय?", विरोधकांच्या आंदोलनानंतर CM सावंतांचा 'कमबॅक'

VIDEO: ट्रॉफी जिंकली पण बोलताना लाज घालवली! पाकिस्तानी क्रिकेटरची पुन्हा फजिती, ट्रान्सलेट करणाऱ्यानेच घातला गोंधळ

'IFFI 2025'साठी गोवा सज्ज! पहिल्यांदाच ओपन-एअरमध्ये होणार भव्य उद्घाटन; CM सावंतांची घोषणा

Konkan Railway: विनातिकीट प्रवाशांना मोठा झटका! 'कोकण रेल्वे'ने वसूल केले तब्बल 12.81 कोटी

"पूजा नाईकवर विश्वास नाही,ती कुणाचंही नाव घेऊ शकते"- मंत्री सुदिन ढवळीकर

SCROLL FOR NEXT