Goa Police Dainik Gomantak
गोवा

Goa Fraud: PMO मध्ये सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचं भासवून टॅक्सीचालकांना गंडा; तोतया व्यक्तीविरोधात तक्रार दाखल!

Goa Fraud Case: पंतप्रधान कार्यालयात सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचे भासवून गोव्यातील टॅक्सीचालकांना गंडा घालण्यात आला. श्रीरंग जावळ असे या तोतया व्यक्तीचे नाव आहे.

Manish Jadhav

राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरणावरुन राजकीय वादंग माजला असतानाच आणखी एक फसणूकीची घटना समोर आली आहे. पंतप्रधान कार्यालयात सिक्युरिटी इन्चार्ज असल्याचे भासवून राज्यातील टॅक्सीचालकांना गंडा घालण्यात आला. श्रीरंग जावळ असे या गंडा घालणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे.

टॅक्सीवाल्यांनी त्याच्याविरुद्ध कळंगुट पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. एवढ्यावरच न थांबता टॅक्सीवाल्यांनी तात्काळ त्याच्या अटकेची मागणी केली. जावळ याच्याविरोधात फसवणूक केल्याचा आरोप यावेळी टॅक्सीचालकांकडून करण्यात आला. एका व्यक्तीने सांगितले की, तो उत्तर गोव्यातील टॅक्सी चालकांना धमकावत असत.

टॅक्सी चालकांच्या म्हणण्यानुसार, तो फिरण्यसाठी टॅक्सी भाड्याने घ्यायचा मात्र पैसे देत नसत. त्याच्याविरोधात यापूर्वी अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत.

काही दिवसांपूर्वी, सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून गंडा घातल्याची अशीच घटना बेतोड्यातून समोर आली होती. आम्ही पोलिस अधिकारी आहोत. थोड्या वेळापूर्वीच काही अंतरावर मोठी लूट झाली आहे. त्यामुळे अंगावरील दागिने सांभाळा, अशी बतावणी करुन दोघा भामट्यांनी एका महिलेचे मंगळसूत्र, पाटल्या, तोडे असे मिळून लाखो रुपयांचे दागिने हातोहात पळवले होते. ही घटना बस्तोडा जंक्शनवर घडली होती.

दोघेही संशयित हे काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन आले होते. ते साध्या वेशातच होते. मात्र ते हिंदी भाषेत बोलत होते. आम्ही सीबीआयवाले पोलिस आहोत, असे भासवून तोतया पोलिसांनी या दांपत्यास गंडवले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mapusa: बेकायदा नोकरभरतीवरून म्‍हापसा पालिका बैठक तापली; 20 पैकी 11 नगरसेवकांचे ‘वॉक आऊट’

Goa Today's Live News: महिलेच्या गळ्यातील लाखभर रुपयांचे मंगळसूत्र लंपास

Honda IDC: अनेकांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी बनलेली सत्तरीतील 'ती औद्योगिक वसाहत पडलीये ओसाड

Chitrasangam 2024: प्रतिभावंतांचा कलाबहर! 'चित्रसंगम'मध्ये 17 चित्रकारांच्या कलाकृती

12th Fail अभिनेत्याकडे नव्हते गोव्यात हॉटेलचे बिल द्यायला पैसे, मुंबईच्या तिकिटासाठी विकला मोबईल; विक्रांतने सांगितला किस्सा

SCROLL FOR NEXT