Goa Fraud: मेरशीतील पॉच बॅग बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला लाखोंचा गंडा; जुने गोवे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल!

Goa Fraud Case: मेरशी येथील एका पॉच बॅग तयार करणाऱ्या कंपनीला मशीनचा पुरवठा करण्याची हमी देवून तब्बल 2.78 लाखांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे.
Goa Fraud: गोव्यातील पॉच बॅग बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला लाखोंचा गंडा; जुने गोवे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल!
Fraud Dainik Gomantak
Published on
Updated on

मेरशी: राज्यात सध्या कॅश फॉर जॉब प्रकरण चांगलंच गाजत आहे. सरकारी नोकरीचे आमिष दाखवून गोमंतकीय तरुणांना लाखोंचा गंडा घालण्यात आला आहे. याचदरम्यान, मेरशी येथून अशीच घटना समोर आली आहे. मेरशी येथील एका पॉच बॅग तयार करणाऱ्या कंपनीला मशीनचा पुरवठा करण्याची हमी देवून तब्बल 2.78 लाखांना गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी जुने गोवे पोलिसांनी अहमदाबादस्थित (गुजरात) प्लाटेक मशिनचे संचालक अजयसिंग सोळंकी यांच्याविरुद्ध फसवणूकीची तक्रार नोंदवली आहे.

दरम्यान, मेरशी येथील रहिवासी प्रमोद कामत यांनी जुने गोवे पोलिसांकडून फसवणूकीची तक्रार नोंदवली. ही फसवणूकीची घटना 26 ते 30 जुलै 2024 या कालावधीत घडल्याचे सांगितले जातेय. कामत यांनी त्यांच्या कंपनीसाठी लागणारी साईड सील पॉच या तीन मशिन्स अहमदाबाद येथील प्लास्टेक मशिन्स या कंपनीकडून मागवली होती. या मशिन्सची किंमत तब्बल 6.75 लाख होती. त्यापैकी कामत यांनी 2.78 लाख संशयित अजयसिंग सोळंकी यांच्या कंपनीच्या खात्यात ट्रान्सफर केले होते.

Goa Fraud: गोव्यातील पॉच बॅग बनवणाऱ्या कंपनीच्या मालकाला लाखोंचा गंडा; जुने गोवे पोलिस ठाण्यात तक्रार दाखल!
Goa Fraud Case: पुण्याच्या ‘एनव्‍हे इनोव्‍हेंचर्स’ लिमिटेडला ग्राहक आयोगाचा दणका; गुंतवणूकदारांचे पैसे परत करण्याचा आदेश

संशयित अजयसिंग सोळंकी यांनी कामत यांना मशिन 6 ते 8 महिन्यांत पाठवण्याची हमी दिली होती. मात्र, साडेतीन महिने होऊनही मशिन्सचा पुरवठा करण्यात आला नाही किंवा अॅडव्हान्स घेतलेले पैसे देखील परत केले नाहीत. त्यामुळे कामत यांनी सोळंकी यांच्याविरोधात जुने गोवे पोलिस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी संशयित अजयसिंग सोळंकी यांच्याविरोधात कामत यांची फसवणूकीची तक्रार नोंदवून घेतली. पुढील तपास पोलीस निरिक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करतायेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com