Man arrested for theft from bike Dainik Gomantak
गोवा

दुचाकीतून रक्कम चोरणं तरुणाला पडलं महागात

फातोर्डा जॉगर्स पार्कजवळील चोरीप्रकरणी संशयिताला बेड्या

दैनिक गोमन्तक

मडगाव : फातोर्डा परिसरात दुचाकीतून पैसे चोरणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. फातोर्ड्यातील जॉगर्स पार्कजवळ एका दुचाकीमधून रोकड लंपास केल्याप्रकरणी तरुणाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. केळशी येथील 27 वर्षीय युवक मॅग्नो रॉड्रिगीस याला फातोर्डा पोलिसांनी चोरीप्रकरणात अटक केली आहे. (Man arrested for theft from bike News Updates)

एका डॉक्टरने दाखल केलेल्या तक्रारीनुसार या युवकाला अटक (Arrest) करण्यात आली आहे. तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे या डॉक्टरने आपली दुचाकी फातोर्डा येथील स्टेडियमजवळ असलेल्या जॉगर्स पार्कजवळ पार्क करून ठेवली होती. यावेळी संशयित आरोपीने 1100 रुपयांची रोकड, दुचाकीची कागदपत्रे सहित इतर कागदपत्रे चोरुन नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

दुचाकीतून रोकड लंपास केल्याप्रकरणी या संशयित युवकाला फातोर्डा (Fatorda) पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताला प्रथम वर्ग न्यायालयात (Court) सादर केले असता पुढील चौकशीसाठी दोन दिवसांच्या रिमांडवर अधिक तपासासाठी ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे. दरम्यान या युवकाने अशा आणखी चोऱ्या केल्यात का याचा शोधही पोलीस घेत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT