Mamata Banerjee Dainik Gomantak
गोवा

अभिषेक बॅनर्जीसोबत दीदी पुन्हा गोव्यात !

नवी दिल्ली आणि मुंबईला भेट दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पुन्हा गोव्याच्या दौऱ्यावर जात आहेत.

दैनिक गोमन्तक

पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील (West Bengal Assembly Election) विजयानंतर टीएमसीने (TMC) आता इतर राज्यांमध्ये आपल्या पक्षाच्या विस्ताराचे काम सुरु केले आहे. नवी दिल्ली आणि मुंबईला भेट दिल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) पुन्हा गोव्याच्या दौऱ्यावर जात आहेत. ममता बॅनर्जी तृणमूल काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस अभिषेक बॅनर्जी (Abhishek Banerjee) यांच्यासोबत 13 डिसेंबर रोजी गोवा दौऱ्यावर जाणार आहेत. ममता बॅनर्जी यांचा हा दुसरा गोवा (Goa) दौरा असेल. ममता बॅनर्जी तीन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावरुन गुरुवारीच कोलकात्यात परतल्या.

ममता बॅनर्जी यांच्या शेवटच्या गोवा दौऱ्यादरम्यान, भारतीय टेनिस स्टार लिएंडर पेस (Leander Paes), ज्येष्ठ अभिनेत्री नफिसा अली आणि प्रसिद्ध गायक रेमो फर्नांडिस यांनी त्यांच्या उपस्थितीत तृणमूलचा झेंडा हातात घेतला होता. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमुळे ममता बॅनर्जी यांचा गोवा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. ममता बॅनर्जी यांना आता बंगालनंतर गोव्यात टीएमसीचा विस्तार करायचा आहे.

गोव्यात पक्ष मजबूतसाठी टीएमसी कार्यरत

गोव्यात टीएमसीने निवडणुकीत उतरण्याचा जोरदार एन्ट्री केली आहे. 'मी एकता आणि धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवते, मी ज्या प्रकारे पश्चिम बंगालशी संलग्न आहे, गोवाही माझ्यासाठी माझी भूमी आहे,' असे ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत गोव्यातील आणखी काही बडे नेते तृणमूलमध्ये सामील होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. विशेष म्हणजे पुढील वर्षी गोवा विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. तृणमूलने तेथे निवडणूक लढवण्याची घोषणा केली असून, आतापासूनच तयारी सुरु केली आहे. तृणमूलचा राष्ट्रीय स्तरावर विस्तार करण्याच्या योजना पाहता गोवा विधानसभा निवडणूक महत्त्वाची असल्याचे बोलले जात आहे.

लिएंडर पेस कोलकाता कार्यकारिणीच्या बैठकीत सहभागी झाला होता

ममता बॅनर्जी यांनी गोव्यातील पक्ष संघटना मजबूत करण्याचे काम कृष्णानगरचे तृणमूल खासदार महुआ मैत्रा यांच्याकडे सोपवले आहे. महुआ वारंवार बैठका घेऊन लोकांना पक्षाशी जोडण्याच्या प्रयत्नात गुंतल्या आहेत. या पार्श्वभूमीवर अभिषेक बॅनर्जी यांचा गोवा दौरा अत्यंत महत्त्वाचा असल्याचे बोलले जात आहे. अभिषेक बॅनर्जी तेथे तृणमुल काँग्रेसच्या सद्यस्थितीचा आढावा घेतील आणि आवश्यक सूचना देतील. कोलकाता येथे झालेल्या TMC वर्किंग कमिटीच्या बैठकीत लिएंडर पेस उपस्थित होते. बैठकीत पक्ष विस्ताराचे नियोजन करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

'माझ्या दारात संकट नाही, तर मला काय देणे-घेणे?' शतकापूर्वी सावरकरांनी कोरडे ओढलेली संकुचित मानसिकता आजही उभी

Budh Nakshatra Parivartan 2026: 8 ऑगस्टपासून 'या' राशींचे नशीब उजळणार; बुधाच्या नक्षत्र बदलाने यशाचे नवे मार्ग खुलणार

Under Secretary Recruitment: अवर सचिव भरतीला कोर्टाचा 'ब्रेक'; राज्य सरकारला दणका; 2 महिला अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीचा फेरविचार करण्‍याचा आदेश

36 Villages Without 4G 5G In Goa: हायस्पीड इंटरनेटपासून 36 गावे अद्याप दूर; खासदार तानावडेंच्‍या प्रश्‍‍नाला केंद्रीय संपर्क राज्‍यमंत्र्यांचे उत्तर

PM Surya Ghar Yojana: 'पीएम सूर्यघर' योजनेअंतर्गत 3,323 घरांवर 'सोलर पॅनेल'; केंद्र सरकारकडून मिळाली 22.58 कोटींची सबसिडी

SCROLL FOR NEXT