West Bengal Chief Minister Mamata Banerjee Dainik Gomantak
गोवा

गोव्यातील सरकार दिल्लीच्या तालावर नाचतेय, दीदींचा सावंतांवर निशाणा

मात्र दिल्ली (Delhi) गोव्याला आपल्या तालावर नाचवत असल्याचे म्हणत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला.

दैनिक गोमन्तक

पणजी: देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूकांचे (Assembly Elections) बिगुल अत्तापासूनच वाजू लागले आहे. यातच आता छोट्याशा गोव्यातही (Goa) विधानसभा निवडणूकीचे पडघम वाजू लागले आहेत. राज्यात सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरु केली आहे. सत्ताधारी भाजप आपल्या पाच वर्षातील कामाचा लेखाजोखा मतदारासमोर माडंत आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेस (Congress), तृणमूल कॉंग्रेस, आपसह स्थानिक पक्ष सत्तेत असणाऱ्या भाजपवर (BJP) निशाणा साधत आहेत. तसेच अनेक राजकीय पक्षांच्या बड्या नेत्यांनी प्रचारसभा घेत गोव्यातील जनतेला रिझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. या सगळ्या पाश्वभूमीवर गोवा हे अत्यंत प्रभावशाली असे राज्य आहे. मात्र विकासाच्या नावावर फक्त सरकार लोकांना फसविण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यातील मच्छिमार बांधव अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. मात्र दिल्ली गोव्याला आपल्या तालावर नाचवत असल्याचे म्हणत ममता बॅनर्जी यांनी मोदी सरकारवरही निशाणा साधला.

तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी गोव्याच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान ममता यांनी शुक्रवारी भाजपवर जोरदार निशाणा साधला. 'मी इथे तुमची सत्ता हिसकावण्यासाठी आलेलो नाही, तर तुम्हाला मदत करायला आलो आहे', असे त्यांनी यावेळी गोव्यातील जनतेला सांगितले. केंद्रावर हल्लाबोल करताना मुख्यमंत्री बॅनर्जी म्हणाले की, दिल्लीची दादागिरी चालणार नाही. बॅनर्जी यांच्या उपस्थितीत नफीसा अली आणि मृणालिनी देशप्रभू यांनी आज औपचारिकपणे तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

'दिल्लीची दादागिरी चालणार नाही आम्हाला संघीय संरचना मजबूत हवी आहे. गोव्याची संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी आम्हाला संपूर्ण सुरक्षा द्यायची आहे. आपण अभिमानाने जगावे, अशी आमची इच्छा आहे. माझ्या धर्माचे चारित्र्य प्रमाणपत्र देणारा भाजप कोण? मला हिंदू असल्याचा अभिमान आहे,' असंही त्या यावेळी म्हणाल्या.

दरम्यान त्या म्हणाल्या, गोव्यातील स्थानिक पक्षांच्या नेत्यांना संबोधित करताना ममता बॅनर्जी म्हणाल्या, "मी धर्मनिरपेक्षतेवर विश्वास ठेवते. माझा एकात्मतेवर विश्वास आहे. तसेच माझा विश्वास आहे की, भारत ही आपली मातृभूमी आहे. त्यामुळे जर बंगाल माझी मातृभूमी असेल, तर गोवाही माझी मातृभूमीच आहे."

आम्ही लोकशाही पध्दतीने निवडणुका लढवतो, मात्र भाजप निवडणुकीच्या काळात दंगे घडवून आणते. आम्ही गोव्यातील समुद्र पाहण्यासाठी आलो आहोत, तुम्हाला काय फरक पडतो? गोव्यातील युवकांना आम्ही येणाऱ्या काळात नव नव्या संधी उपलब्ध करुन देणार आहोत असही त्या म्हणाल्या. तर दुसरीकडे ममता बॅनर्जी यांनी राज्यातील भाजप सरकारचा 'सरकार तुमच्या दारी' या सरकारच्या योजनेवरही त्यांनी हल्लाबोल केला.

गोव्यातील खाणकाम आणि पर्यटन क्षेत्रासाठी दीदींचा नवा मास्टर प्लॅन

येणाऱ्या काळात खाणकामासाठी आम्ही नवीन पॉलीसी तयार करत आहोत. तसेच खाणकामाबरोबर पर्यटनासाठी आम्ही नव्या संधी उपलब्ध करुन देणार आहोत. पर्यटन क्षेत्रासाठी जेवढे करणे आवश्यक आहे तेवढे कमीच आहे, परंतु आम्ही लवकरच पर्यटन क्षेत्राला उभारी देण्यासाठी नवा मास्टर प्लॅन तयार करत आहोत. आम्ही फक्त राजकारण करत नाही तर विकासही करतो. निवडणूक आयोगाबद्दल बोलायला पुढीलवेळी गोव्यात येईन तेव्हा फुटबॉल घेऊन येईन, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला.

तसेच, भारताचा प्रसिध्द टेनिसपटू याने आज पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत गोव्यात टीएमसीमध्ये प्रवेश केला. यावेळी बोलताना लिएंडर पेस म्हणाला, ''भारतीय लोकशाही खूप मोठी आहे, माझा जरी जन्म पश्चिम बंगालमध्ये झाला असला तरी गोवा माझे दुसरे घर आहे.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vice President Candidate: ठरलं! एनडीए’चे उपराष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून सी.पी. राधाकृष्णन यांच्या नावाची घोषणा

Goa Film Festival 2025: ज्येष्ठ अभिनेत्री वर्षा उसगावकर जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित, ‘जुझे’ ठरला सर्वाधिक पुरस्कार विजेता चित्रपट

'...नाहीतर देशाची माफी मागा’, राहुल गांधींच्या आरोपांवर मुख्य निवडणूक आयुक्तांचे थेट प्रत्युत्तर; दिली 7 दिवसांची मुदत

Viral Video: 'सापांचा राजा'! जगातील सर्वात लांब विषारी सापाचा व्हिडिओ व्हायरल, एका हल्ल्यात घेऊ शकतो हत्तीचाही जीव

Weekly Health Horoscope: आरोग्याच्या दृष्टीने आव्हानात्मक आठवडा! 'या' 5 राशींनी निष्काळजीपणा टाळावा

SCROLL FOR NEXT