मी हिंदूच, भाजपने मला जातीचे प्रमाणपत्र देण्याची गरज नाही; दीदींचा घणाघात

दिल्लीची दादागिरी चालणार नाही असे खडेबोल भाजपला (BJP) सुनवत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) प्रचाराचा नारळ फोडला.
दिल्लीची दादागिरी चालणार नाही असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.
दिल्लीची दादागिरी चालणार नाही असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे. Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दिल्लीची दादागिरी चालणार नाही असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गोव्यात (Goa) तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) प्रचाराचा नारळ फोडला आहे.

यावेळी गोव्याचे माजी मुख्यमंत्री फालेरो, टीएमसी खासदार डेरेक ओब्रायन आणि स्थानिक नेते उपस्थित होते.

दिल्लीची दादागिरी चालणार नाही असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.
ममता बॅनर्जी गोव्यात दाखल !

बॅनर्जी म्हणाल्या, गोव्याची कला संस्कृती आणि वारसा जपण्यासाठी तृणमूल प्रयत्न करेल. आपल्याला आत्मसन्मानाने जगण्यासाठी तृणमूल काँग्रेस मदत करेल. भाजप लोकांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करीत आहे. आम्ही मरेन पण लोकांमध्ये फूट पाडू देणार नाही. धर्मनिरपेक्ष, सर्वधर्मसमभावाचा धागा अधिक बळकट करण्यासाठी तृणमूल नेहमीच प्रयत्नशील राहील. काही लोक आम्हाला काळे झेंडे दाखवत आहेत. मात्र लवकरच गोमंतकीय जनता त्यांना ब्लॅक लिस्ट करेल . मी हिंदू आहे त्याचा मला अभिमान आहे. पण भाजपने (BJP) मला जातीचे प्रमाणपत्र देवू नये असे सांगत ममता बॅनर्जी यांनी भाजप सरकारला खडे बोल सुनावले.

त्या म्हणाल्या, मासे आणि फुटबॉल या दोन गोष्टी बंगाल आणि गोव्याला जोडतात. गोवा सुंदर राज्य आहे. केंद्र आणि राज्य सरकारची 'दादागिरी' आम्ही खपवून घेणार नाही. मी गोव्यात ना सत्ता मिळविण्यासाठी आले आहे ना मुख्यमंत्री होण्यासाठी आले आहे. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे.

दिल्लीची दादागिरी चालणार नाही असे म्हणत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी गोव्यात तृणमूल काँग्रेसच्या प्रचाराचा नारळ फोडला आहे.
गोव्यात आगमन होताच दीदींना दाखवले हिंदू संघटनांनी काळे झेंडे

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पुढील वर्षाच्या सुरुवातीला होणाऱ्या राज्य निवडणुकांपूर्वी तृणमूल काँग्रेसला बळकट करण्यासाठी तीन दिवसांच्या गोव्याच्या दौऱ्यावर आल्या आहेत. मुख्यमंत्री म्हणून त्यांचा हा पहिलाच गोवा दौरा आहे. ममता बॅनर्जींच्या दौऱ्याचा उद्देश मतदारांना असा संकेत देणे देखील आहे की त्यांचा पक्ष राज्याच्या राजकारणात स्वत:चे स्थान निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेल. गुरुवारी ममता बॅनर्जी यांनी आपला बहुतांश वेळ पक्षाच्या नेत्यांना भेटण्यात घालवला.

अभिनेत्री नफिसा अली यांचा TMC मध्ये प्रवेश

गोव्यात पक्षाच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या उपस्थितीत अभिनेत्री नफिसा अलीने तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. 2022 च्या विधानसभा निवडणुकीत TMC गोव्यात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहे. राज्यसभेचे नेते डेरेक ओब्रायन, खासदार सौगता रॉय, महुआ मोईत्रा आणि राजकीय सल्लागार गट, इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटी (I-PAC) आणि त्याचे संस्थापक प्रशांत किशोर यांच्यासह टीएमसीची आगाऊ टीम आधीच राज्यात होती. शुक्रवारी ममता बॅनर्जी मच्छीमार आणि नागरी समाजाच्या सदस्यांशी संवाद साधणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com