ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या ब्राह्मण आहेत, स्वातंत्र्य सैनिकाच्या कन्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हिंदूंची 50% पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. Dainik Gomantak
गोवा

'ममता बॅनर्जी या हिंदू ब्राह्मणच',भाजपच्या हिंदूविरोधी टिकेला TMC चे उत्तर

ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या ब्राह्मण आहेत, स्वातंत्र्य सैनिकाच्या कन्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हिंदूंची 50% पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. असे चोख प्रत्युत्तर किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांनी भाजपला दिले आहे.

दैनिक गोमन्तक

पणजी: तृणमूल काँग्रेस (TMC) ला हिंदूविरोधी म्हणून चित्रित करण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना रोखण्यासाठी, टीएमसीच्या (TMC) कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या कट्टर हिंदू ब्राह्मण आहेत. बहुसंख्य समुदायाचा त्यांच्यावर विश्वास आहे. असे टीएमसीचे प्रवक्ते किरण कांदोळकर (Kiran Kandolkar) यांनी पत्रकार परिषदेला स्पष्ट केले. आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजप (BJP) बॅनर्जी आणि टीएमसीच्या विरोधात खोटी मोहीम चालवत आहे. असेही कांदोळकर यांनी सांगितले.

माजी आमदार किरण कांदोळकर म्हणाले, भाजप बॅनर्जींना मुस्लिम समर्थक म्हणवून "नकारात्मक प्रकाशात" चित्रित करण्याचा प्रयत्न करीत आहे. पश्चिम बंगाल सोडून आसाममध्येही मुस्लिम स्थायिक आहेत. भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारने टीएमसीकडे बोट दाखवण्याऐवजी आधी मुस्लिमांना हुसकावून लावले पाहिजे, असेही ते म्हणाले.

ममता बॅनर्जी या ब्राह्मण आहेत, स्वातंत्र्य सैनिकाच्या कन्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींना हिंदूंची 50% पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. टीएमसीने बॅनर्जींची जात आणि पंथ हायलाइट करण्याची ही पहिलीच वेळ नाही. या वर्षाच्या सुरुवातीला झालेल्या बंगाल विधानसभा निवडणुकीत भाजपने टीएमसीला मुस्लिम समर्थक पक्ष म्हणून चित्रित करण्याचा प्रयत्न केल्यानंतर बॅनर्जींनी त्यांचे गोत्र देखील सांगितले होते.

टीएमसी रोहिंग्या मुस्लिमांचा पक्ष आहे, असे भाजप म्हणत आहे. भाजपने अभ्यास करून रोहिंग्या मुस्लिम कोठून आले आहेत, याचा शोध घेण्याची गरज आहे. त्यापैकी बहुतांश आसाममध्ये आहेत जिथे भाजपची सत्ता आहे. आसाम सरकारने त्या सर्वांना हलवण्यास सांगावे, असे कांदोळकर यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT