अध्यक्षा ममता बॅनर्जी गोव्यात आगमन झाले यावेळी त्यांचे स्वागत करताना तृणमूल काँग्रेस खासदार लुईझीन फालेरो, तृणमूल नेते किरण कांदोळकर व इतर. Dainik Gomantak
गोवा

ममता बॅनर्जी यांचे गोव्यात आगमन

मगोप-तृणमूल काँग्रेस युतीचा धसका विरोधक पक्षांनी घेतला असून यावेळी नकारात्मक प्रचार युतीसमोर टिकणार नाही.

दैनिक गोमन्तक

वास्को: पश्चिम बंगाल मुख्यमंत्री तथा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्ष अध्यक्षा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांचे आज गोव्यात दाबोळी विमानतळावर आगमन झाले.यावेळी त्यांच्या स्वागतासाठी राज्यसभा खासदार लुईझीन फालेरो, तृणमूल काँग्रेस नेते किरण कांदोळकर व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.ममता बॅनर्जी यांचे आगमन होताच कार्यकर्त्यांनी नारेबाजी लावली.

पश्चिम बंगाल मुख्यमंत्री तथा अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस पक्ष अध्यक्षा ममता बॅनर्जी यांचे आज रविवारी गोव्यात आगमन झाले. त्या दोन दिवस गोवा दौऱ्यावर आहेत.या दिवशी आणखी मोठ्या योजन घोषित होण्याची शक्यता आहे. यात महिलांना विधानसभा व लोकसभा निवडणुकीत आरक्षण, विधवा महिलांना अर्थसहाय्य, बेरोजगारांना महिना भत्ता, सरकारी नोकऱ्या, खाण अवलंबित विषय प्रामुख्याने चर्चेत आहे.

तृणमूलच्या नेत्या तथा पश्चिम बंगालच्या मुख्यंमत्री ममता बॅनर्जी गोव्यात दाखल. सोमवारी ठिकठिकाणी वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात राष्ट्रवादीचे आमदार चर्चिल आलेमाव आणि त्यांच्या कन्या वालंका आलेमाव सोमवारी तृणमूल काँग्रेसमध्ये पश्चिमबंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जीच्याउपस्थितीत प्रवेश करणार आहे.यासाठी बाणावलीत भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

मगोप-तृणमूल काँग्रेस युतीचा धसका विरोधक पक्षांनी घेतला असून यावेळी नकारात्मक प्रचार युतीसमोर टिकणार नाही. कारण गोवा राज्यातील जनतेने परीवर्तन करणारच असे ठामपणे सांगितले आहे. निवडणूक कायदा लागू झाल्यानंतर उघडपणे त्यावर मतप्रदर्शन होणार आहे. एकूणच तृणमूल काँग्रेस पक्षाने घोषित केलेली गृहलक्ष्मी कार्ड योजना महिलांना उत्साह निर्माण करणारी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT