Crime News Goa Dainik Gomantak
गोवा

Goa Crime: 55 वर्षीय टॅक्सीचालकाला जबर मारहाण! पारधी टोळीच्या म्होरक्यांना अटक; पुणे-पंढरपूर कनेक्शन उघड

Malpe Pernem Taxi Driver Attack: : मालपे-पेडणे येथे महामार्गावर कळंगुट येथील ५५ वर्षीय टॅक्सीचालकाला जबर मारहाण प्रकरण हे आंतरराज्य टोळीशी निगडित आहे, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे.

Sameer Panditrao

म्हापसा: मालपे-पेडणे येथे महामार्गावर कळंगुट येथील ५५ वर्षीय टॅक्सीचालकाला जबर मारहाण प्रकरण हे आंतरराज्य टोळीशी निगडित आहे, असे पोलिस तपासातून पुढे आले आहे. याप्रकरणी गोवा व महाराष्ट्र पोलिस हे संयुक्तपणे तपास करीत आहेत. या टोळीचे धागेदोरे पुणे आणि पंढरपूरपर्यंत पसरले आहेत, असे सूत्रांनी सांगितले.

विशेष म्हणजे, ज्या टोळीने हा हल्ला केला, यातील सहभागी दोघा पारधी टोळीच्या सराईत म्होरक्यांना अटक करण्यात सिंधुदुर्ग पोलिसांना यश आले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मालपे येथील हल्ला प्रकरणातील टोळीत सहाजणांचा समावेश होता.

यात एक अल्पवयीनही आहे. ही टोळी महाराष्ट्रातील पारधी गँग असून यातील दोघांना पकडण्यात महाराष्ट्र पोलिसांना यश आले असून उर्वरितांचा पोलिस शोध घेत आहेत. शंकर मधुकर पवार(वय २७ वर्षे) आणि राजू मधुकर पवार (वय २५ वर्षे) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत.

बुधवारी (ता.९) रात्री मालपे येथे संजीवन वेंगुर्लेकर यांच्यावर या आंतरराज्य टोळीने हल्ला करून घटनास्थळावरून पोबारा केला होता. यात ते गंभीर जखमी झाले होते. हल्ल्यानंतर संशयितांनी सावंतवाडीच्या दिशेने पळ काढला होता. या टोळीकडे धारदार शस्त्रे होती.या घटनेनंतर या टोळीने सावंतवाडीमध्ये चोरी केली. तिथे टोळीने दोन मोटरसायकल व मोबाईल चोरले. संशयितांनी एका बंगल्यामधून किमती ऐवज चोरला.

‘त्या’ दोघांच्या सहभागाची शक्यता

शुक्रवारी जुने गोवे पोलिसांनी हुबळी येथे दोघा संशयितांना अटक केली होती. या संशयितांचा या प्रकरणाशी संबंध असल्याची शक्यता असल्याने सोमवारी किंवा मंगळवारी पेडणे पोलिस जुने गोवे येथे या संशयितांची चौकशी करणार आहेत. या प्रकरणात ५ ते ६ गट सामील असून त्यापैकी एका गटातील हे दोघे असल्याचा संशय आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT